होम Blog

गोदी मीडियाच ग्रहण!

0

ण्णा हजारे आजपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल हे दोन प्रमुख विषय घेऊन पुन्हा एकदा उपोषणाला बसले परंतु माध्यमांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. लोकपालच्या मुद्द्यावरून २०११ मध्ये देशव्यापी आंदोलन केली. त्यानंतर सात वर्षांनी पुन्हा याच मुद्द्यावर दिल्लीत उपोषणाचा श्रीगणेशा केला. अण्णांनी  मागच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात जे आंदोलन केले होते त्याला माध्यमांनी २४ तास प्रसिध्दी दिली जात होती. परंतु आता माध्यम सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्यामुळे कव्हरेज पासून रोखण्यात आले. आठवडाभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांवर टीका केली होती. तसेच विरोधकांच्या बातम्या दाबल्या जात आहेत असा आरोप केला होतो तो आरोप योग्यच आहे. कारण काही बोटावर मोजण्या इतकेच माध्यम प्रसिध्दी देत आहेत. हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. अण्णा हजारे यांनी भाजपचं सरकार आल्यानंतर दीड महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होते आणि सशक्त लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक सुधारणा हे तीन मुख्य मुद्दे मांडले होते. पण पंतप्रधानांकडून काहीही उत्तर आलं नाही. आतापर्यंत पंतप्रधान मोदींना ४३ पत्रं अण्णांनी लिहिली आहेत. पण एकाचंही उत्तर आलं नाही. ८ महिन्यांपूर्वी आंदोलनाचा इशारा देणारं पत्र अण्णांनी पंतप्रधानांना लिहिलं होत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. भाजपा ज्यावेळी विरोधी बाकावर होते. त्यावेळी अण्णांचा आंदोलन याच भाजपा,संघाच्या मंडळींनी घडवून आणल होत असा आरोप करण्यात येत होत. आता भाजपा सत्तेत आल्यामुळे त्यांनी अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यातच भाजपाचा दुटप्पीणा दिसून येतो. अण्णा हजारे यांनी आता  लोकपाल, शेतकरी आणि निवडणूक सुधारणा यासह सरकारकडे दहा मागण्या केल्या आहेत. लोकपाल कायद्यानुसार, लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नेमणुका व्हाव्यात ही मुख्य मागणी आहे. शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी कृषीमूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्या, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल यासारख्या तरतुदी सरकारला सुचवल्या. अण्णांनी २० राज्यांत ४० सभा घेतल्या. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. शेतकरी त्यांचे प्रश्न अण्णांकडे  मांडले होते. अण्णांनी आतापर्यंत १६ उपोषण केलं, आंदोलनं केली. या आंदोलनातूनच तर माहितीचा अधिकार आला, ग्रामसभा, दफ्तर दिरंगाई, लोकपाल यासारखे कायदे सरकारला आणावे लागले. आता लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झगडत आहेत. देशात शेतकरी आत्महत्या करतोय. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची चिंता आहे. देशातले उद्योगपती घबाड घेऊन देशाबाहेर पळून गेले तरी सरकार यावर काही करत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कृषीमूल्य आयोग नेमा, त्याला स्वायत्तता देऊन त्यावर अनुभवी शेतकऱ्यांची नेमणूक करा अशा मागण्या कागदोपत्रीच आहेत. मागच्या वेळी माध्यमांनी अण्णांच आंदोलन उचलून धरलं होत. आता मोठमोठ्या मुलाखती घेतात पण जेवढी बातमी यायला हवी तेवढी दिसत नाही. यामुळे अण्णा जी खंत व्यक्त करत आहेत ती योग्यच आहे. मात्र माध्यमांनी सरकारच्या दबावापोटी काम न करता लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून काम करावे. अन्यथा माध्यमांवरील विश्वास उडाला तर माध्यमांची कवडीची किंमत राहणार नाही हे माध्यमांनी विसरता कामा नये.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक

सरकार घोषणाबाजीत ‘हिरो’ कामात ‘झिरो’: खा. चव्हाण

0

यवतमाळ: केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार घोषणाबाजीत हिरो असून कामात झिरो आहे.  सरकारने घोषणा केलेल्या एकाही योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही. या जनविरोधी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले ते यवतमाळ येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबीराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत. ज्याप्रमाणात महागाई वाढते आहे त्याप्रमाणात शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही. आज पुन्हा एका शेतक-याने मंत्रालयाच्या गेटवर आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्यात १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली. जालन्यामध्ये एका शेतक-याने पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेले पीक स्वतःच्या हाताने नष्ठ केले. केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्षाच्या दिल्ली येथील महाअधिवेशनात शेतक-यांसाठी कृषी विषयक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कृषी धोरणात अमुलाग्र करून शेतक-यांचा मालाला योग्य हमीभाव. गरजू शेतक-यांना २००९ प्रमाणे कर्जमाफी, शेतक-यांच्या मुलांना उत्तम शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा आणि शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना. उत्पादन खर्चावर आधारित हमीभावासाठी कायदा, शेतक-यांच्या फायद्याची नविन पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीवेळी शेतक-यांना मिळणा-या मदतीत वाढ अशा विविध कल्याणकारी योजना काँग्रेस सरकार आल्यावर सुरु केल्या जातील असा प्रस्ताव मंजूर केला आहे या प्रस्तावांची माहिती जनतेपर्यंत घेऊन जा असे खा. चव्हाण म्हणाले.

यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना सिंचन सुविधा देण्यासाठी मुबारकपूरनजीक वर्धा बॅरेज मध्यम प्रकल्पाची सुरुवात काँग्रेस सरकारने केली या प्रकल्पामुळे १७ गावातील पाच हजार ६६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पण शासन निधी देत नसल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यवतमाळ शहराला वीस दिवसांत एकदा पाणी मिळते.  शेतकरी, कष्टकरी, दलित, महिला, आदिवासी, विद्यार्थी, तरूण यापैकी समाजातील एकही घटक सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करा. शेतक-यांच्या शेतमाला हमी भाव आणि तरूणांच्या हाताला काम फक्त काँग्रेस सरकारच देऊ शकते त्यामुळे देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

या शिबिराला विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मोघे, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, आ. हरिभाऊ राठोड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आ. वामनराव कासावार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखे, एनएसयुआय चे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख,  महिला जिल्हाध्यक्षा माधुरीताई अराटे यांनीही मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मिडीया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सोशल मिडीयाचे सादरीकरण केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरीताई आडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी पळ काढला !

0

मुंबई: सत्ताधारी पक्षानेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची नवीन प्रथा सुरु करुन, स्वतःचे अपयश झाकण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणतीही चर्चा सभागृहात सरकारला होऊ द्यायची नसल्यामुळेच सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास ठराव चर्चेला न आणता सत्ताधारी पक्षाने आज विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडून गोंधळात तो संमत करुन घेतला. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सरकारच्या या कृतीवर कडक शब्दात टीका करुन सरकारनेच संसदीय परंपरा आणि प्रथांना काळीमा फासला असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाची चर्चेची तयारी असतानाही सरकार पक्षाने सभागृहातून पळ काढणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचाच प्रकार आहे. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सभागृहात घडलेल्या घडामोडींची माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, ५ मार्चला आम्ही अध्यक्षांविरोधात आम्ही अविश्वास ठराव दाखल केला.१४ दिवसांच्या मुदतीमध्ये हा ठराव सभागृहाच्या कामकाजपत्रिकेवर येणे अपेक्षित होते. याबाबत सभागृहात दोनवेळा आम्ही मागणी करुनही हा अविश्वास ठराव कामकाज पत्रिकेवर येऊ दिला नाहीच उलट अधिकार नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच आम्ही योग्यवेळी मांडू असे सांगितले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनीच कार्यक्रम पत्रिकेवर कोणताही उल्लेख नसताना विश्वास ठराव मांडून तो काही अवधीत संमत करुन घेतला यासाठी त्यांनी २००६ सालचा संदर्भ दिला पण विरोधक चर्चा करायला तयार असतानाही सत्तारुढ पक्षानेच सभागृहात गोंधळ घातला. तुमच्याकडे जर बहुमत होते तर मग सभागृहातून पळ का काढला ? असा सवालही विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला.

सभागृहातील प्रथा आणि परंपरांना काळीमा फासण्याचा हा प्रकार दुर्दैवी असून सभागृहातील कामकाजही सत्ताधारी पक्षांनी आज उरकून घेतले. वास्तविक विरोधी पक्षाचा २९३ च्या ठरावाची चर्चा सभागृहात सुरु होती. कायदा, सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराबाबतची चर्चा सरकारला होऊच द्यायची नव्हती यामुळेच सभागृहातील कामकाज सत्ताधारी पक्षानी जाणीवपूर्वक बंद पाडले असले तरी अद्यक्षांविरोधात आम्ही दाखल केलेला अविश्वास ठराव अजूनही कायम असून सोमवारी हा ठराव कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावा अशी मागणी विधानसभा सचिवांकडे आम्ही केली असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

…………………………………………………………………………………

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तक्रार केली.

राज्यपालांच्या भेटीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. जयंत पाटील, आ. नसीम खान, आ. सुनिल केदार, आ. आसिफ शेख, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. वैभव पिचड, आ. नरहरी झिरवाळ, आ. काशिराम पावरा, आ. राहुल बोंद्रे, आ. त्रिंबक भिसे, आ. अमर काळे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संग्राम थोपटे, आ. अब्दुल सत्तार, आ. प्रदीप नाईक, आ.विजय भांबळे, आ. जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.

मुंबई, दि. २३ मार्च २०१८

सत्ताधारी पक्षानेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची नवीन प्रथा सुरु करुन, स्वतःचे अपयश झाकण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणतीही चर्चा सभागृहात सरकारला होऊ द्यायची नसल्यामुळेच सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास ठराव चर्चेला न आणता सत्ताधारी पक्षाने आज विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडून गोंधळात तो संमत करुन घेतला. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सरकारच्या या कृतीवर कडक शब्दात टीका करुन सरकारनेच संसदीय परंपरा आणि प्रथांना काळीमा फासला असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाची चर्चेची तयारी असतानाही सरकार पक्षाने सभागृहातून पळ काढणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचाच प्रकार आहे. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सभागृहात घडलेल्या घडामोडींची माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, ५ मार्चला आम्ही अध्यक्षांविरोधात आम्ही अविश्वास ठराव दाखल केला.१४ दिवसांच्या मुदतीमध्ये हा ठराव सभागृहाच्या कामकाजपत्रिकेवर येणे अपेक्षित होते. याबाबत सभागृहात दोनवेळा आम्ही मागणी करुनही हा अविश्वास ठराव कामकाज पत्रिकेवर येऊ दिला नाहीच उलट अधिकार नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच आम्ही योग्यवेळी मांडू असे सांगितले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनीच कार्यक्रम पत्रिकेवर कोणताही उल्लेख नसताना विश्वास ठराव मांडून तो काही अवधीत संमत करुन घेतला यासाठी त्यांनी २००६ सालचा संदर्भ दिला पण विरोधक चर्चा करायला तयार असतानाही सत्तारुढ पक्षानेच सभागृहात गोंधळ घातला. तुमच्याकडे जर बहुमत होते तर मग सभागृहातून पळ का काढला ? असा सवालही विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला.

सभागृहातील प्रथा आणि परंपरांना काळीमा फासण्याचा हा प्रकार दुर्दैवी असून सभागृहातील कामकाजही सत्ताधारी पक्षांनी आज उरकून घेतले. वास्तविक विरोधी पक्षाचा २९३ च्या ठरावाची चर्चा सभागृहात सुरु होती. कायदा, सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराबाबतची चर्चा सरकारला होऊच द्यायची नव्हती यामुळेच सभागृहातील कामकाज सत्ताधारी पक्षानी जाणीवपूर्वक बंद पाडले असले तरी अद्यक्षांविरोधात आम्ही दाखल केलेला अविश्वास ठराव अजूनही कायम असून सोमवारी हा ठराव कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावा अशी मागणी विधानसभा सचिवांकडे आम्ही केली असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

—-००००००००—-

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तक्रार केली.

राज्यपालांच्या भेटीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. जयंत पाटील, आ. नसीम खान, आ. सुनिल केदार, आ. आसिफ शेख, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. वैभव पिचड, आ. नरहरी झिरवाळ, आ. काशिराम पावरा, आ. राहुल बोंद्रे, आ. त्रिंबक भिसे, आ. अमर काळे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संग्राम थोपटे, आ. अब्दुल सत्तार, आ. प्रदीप नाईक, आ. विजय भांबळे, आ. जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.

जॅकलिन फर्नांडिसच्या डोळ्याला गंभीर इजा!!

0

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, सध्या अबूधाबीमध्ये असलेली जॅकलिन गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तिच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचे समजते.

अबुधाबीमध्ये ‘रेस3’चे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॅकलिन जखमी झाली. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, शूटींगदरम्यानच्या फावल्या वेळात जॅक स्क्वॅश खेळत होती. यावेळी बॉल थेट तिच्या डोळ्यावर येऊन आदळला. तो इतक्या जोरात आदळला की, जॅकच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. यानंतर लगेच तिला रूग्णालयात हलवण्यात आली. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. उद्या पुण्यात ‘दा-दबंग’ टुरसाठी जॅक उपस्थित राहणार होती. सलमान खान आणि डेली शाह या दोघांसोबत ती परतणार होती. मात्र त्यापूर्वीच तिच्या डोळ्यांला गंभीर इजा झाली.
जॅकलिनला स्क्वॅश हा खेळ अतिशय आवडतो. गेल्या काही दिवसांतील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरचे फोटो पाहिले असता तिचे ‘स्क्वॅश’ प्रेम दिसून येते. हाच गेम खेळताना आपण गंभीर जखमी होऊन असे जॅकला स्वप्नातही वाटले नसेल. आता केवळ या दुखापतीतून जॅक लवकर बरी व्हावी, अशी आशा करूयात.
‘रेस3’ या चित्रपटात जॅक सलमान खानसोबत दिसणार आहे. गत सोमवारीच या चित्रपटातील जॅकलिनचा फर्स्ट लूक समोर आला होता. यात ती अतिशय डॅशिंग अंदाजात बघायला मिळाली होती.  काळ्या रंगाचा व्ही शेप टॉप, हाफ क्लच  हेअरस्टाइल आणि हातात गन असा तिचा अंदाज होता.
या चित्रपटात सलमान व जॅकलिनशिवाय बॉबी देओल, साकिब सलीम, डेजी शाह मुख्य भूमिकेत आहेत.  सोनाक्षी सिन्हाही यात कॅमिओ रोलमध्ये दिसेल.‘रेस3’मध्ये सलमान पहिल्यांदा निगेटीव्ह कॅरेक्टरमध्ये दिसेल. त्यामुळे सलमानचे चाहते प्रचंड उत्सूक आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मनोहर पर्रिकरांच्या नावाने व्हायरल ‘ती’ पोस्ट त्यांच्यावेळी झाली होती व्हायरल!

0

Manohar Parikar

नवी दिल्लीः गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. एक कर्तव्यनिष्ठ आणि सच्चे राजकारणी म्हणून सुपरिचित असलेल्या पर्रिकरांबद्दल सगळ्यांनाच आदर वाटतो. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबतही प्रत्येकालाच काळजी लागून राहिलीय. या पार्श्वभूमीवर, पर्रिकरांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झालाय. परंतु, त्यामागचं वास्तव वेगळंच आहे. 

माणूस आयुष्यभर पैसा, प्रसिद्धी, मानमरातब याच्या मागे लागतो, पण नातीगोती जपायला विसरतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्याकडे काहीच नसतं, अशा आशयाची – जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी पोस्ट मनोहर पर्रिकर यांच्या नावाने फिरतेय. अमेरिकेत उपचार घेतानाचे त्यांचे हे शब्द असल्याचं त्यात म्हटलंय. पण, हा सूर माणसं जोडणाऱ्या, मनमिळाऊ, अजातशत्रू मनोहर पर्रिकरांचा असूच शकत नाही, हे ते वाचताना जाणवलं आणि ‘लोकमत डॉट कॉम’ने त्याची खातरजमा करून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, विचित्र प्रकार समोर आला.

मनोहर पर्रिकर यांच्या नावाने फिरणारी ही पोस्ट याआधी अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या नावाने इंग्रजीत फिरली होती. ‘स्टीव्ह जॉब्स यांचे मृत्युशय्येवर असतानाचे शब्द’ म्हणून हा मेसेज २०१५ मध्ये व्हायरल झाला होता. पण, तो धादांत खोटा असल्याचा खुलासा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याच मेसेजचा मराठी अनुवाद करून आता ही पोस्ट पर्रिकरांच्या नावाने पसरवली जातेय. त्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे तुम्हाला जर हा मेसेज आला, तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि तो फॉरवर्ड तर अजिबातच करू नका.

तुम्हीच बघा…

………….

१०० वेळा वाचला तरीही , पुन्हा १०१ वेळा सर्व वाचायला आवडेल  असा हा लेख ……

Manohar Parrikar CM of Goa admitted in USA त्यांचे हे शब्द … 👇

Political क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली….*
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले….

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी political status माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्यु जवळ श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा समाजसेवा करणे.

सातत्यानं केवळ politics मागे धावण्यामुळे माणूस  ‘आतून’ फक्त आणि फक्त पिळवटतच जातो… अगदी माझ्यासारखा…

आयुष्यभर मी जी संपत्ती and political मानमरातब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही…

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?…”आजारपणाचा बिछाना” …(defence cha nahin)

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे ministers ठेवता येतात… पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही…

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते  “आपलं आयुष्य” ” काळ ” ” समय “.

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात ‘आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय’ ही जाणिव असते…ते पुस्तक असतं “निरोगी जगण्याचं पुस्तक”.

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

स्वत:कडे दुर्लक्ष  करू नका… स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा…

लोक माणसं वापरायला शिकतात, आणि पैसे जपायला शिकतात वास्तविक पैसा वापरायला हवा, आणि माणसं जपायला हवीत… आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा…!!!
MANOHAR GOPALKRISHNA PARRIKAR
💐💐💐💐💐💐💐

……………

“I reached the pinnacle of success in the business world. In others’ eyes, my life is an epitome of success.

However, aside from work, I have little joy. In the end, wealth is only a fact of life that I am accustomed to.

At this moment, lying on the sick bed and recalling my whole life, I realize that all the recognition and wealth that I took so much pride in, have paled and become meaningless in the face of impending death.

In the darkness, I look at the green lights from the life supporting machines and hear the humming mechanical sounds, I can feel the breath of god of death drawing closer …

Now I know, when we have accumulated sufficient wealth to last our lifetime, we should pursue other matters that are unrelated to wealth …

Should be something that is more important:

Perhaps relationships, perhaps art, perhaps a dream from younger days

Non-stop pursuing of wealth will only turn a person into a twisted being, just like me.

God gave us the senses to let us feel the love in everyone’s heart, not the illusions brought about by wealth.

The wealth I have won in my life I cannot bring with me. What I can bring is only the memories precipitated by love.

That’s the true riches which will follow you, accompany you, giving you strength and light to go on.

Love can travel a thousand miles. Life has no limit. Go where you want to go. Reach the height you want to reach. It is all in your heart and in your hands.

What is the most expensive bed in the world?

Sick bed …

You can employ someone to drive the car for you, make money for you but you cannot have someone to bear the sickness for you.

Material things lost can be found. But there is one thing that can never be found when it is lost — Life.

When a person goes into the operating room, he will realize that there is one book that he has yet to finish reading — Book of Healthy Life.

Whichever stage in life we are at right now, with time, we will face the day when the curtain comes down.

Treasure Love for your family, love for your spouse, love for your friends.

Treat yourself well. Cherish others.”

– STEVE JOBS

कार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर!

0

नवी दिल्ली – माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. चिदंबरम यांना दहा लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७ मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.

कॅनडाची ‘ही’ मॉडेल लय भारी!

0

Canedian Modelजगभरात लोक दोन गोष्टींवर सगळ्यात जास्त प्रेम करतात एक म्हणजे पैसा आणि दुसरं सौंदर्य.जगभरात डोळे दिपवणा-या आणि प्रेमात पाडणा-या अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या सौंदर्यावर रसिक अक्षरक्ष: जीव ओवाळून टाकतात.

सौंदर्यवती अभिनेत्री आणि मादक अदांच्या मॉडेल्सनी जगभरातील रसिकांना वेड लावल्याची अनेक उदाहरणं आहे. या अभिनेत्री आणि मॉडेल्सचे फोटो तासनतास न्याहळत बसणारेही अनेक आहेत. जगभरात अशा अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री आहेत. मात्र सध्या जगात एका मॉडेल्सच्या नावाचा डंका ऐकायला मिळतोय. तिचे फोटो सोशल मीडिया आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.स्वतःला फिट आणि मेन्टेन ठेवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तिचे फोटो आणि मादक अदा पाहून तुम्हाला अक्षरक्षा वेड लागेल.या मॉडेलचे नाव आहे अमांडा एलिसा. ती कॅनडाची राहणारी असून तिचा जन्मही कॅनडातच झालाय. अमांडा एक मॉडेल असण्यासोबत एक फिटनेस ट्रेनरसुद्धा आहे.सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टिव्ह असते. या सोशल नेटवर्किंग साईटवर ती स्वतःचे हॉट आणि सेक्सी फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा एक एक फोटो आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलवर सेव्ह करण्यासाठी रसिक उत्सुक असतात तसंच ती नवा फोटो कधी टाकणार अशीही त्यांना प्रतीक्षा असते ही माहितीही समोर आली आहे. सोशल मीडियावर अमांडा बरीच लोकप्रिय आहे. तिचे जवळपास दहा मिलियन फॉलोअर आहेत. अमांडाने फॅशन जगतातही नशीब आजमावलं. फॅशन जगतात तिचं नाव आघाडीवर आहे. फिटनेश आणि फॅशन संदर्भातील उत्पादनांची ती ब्रँड ऍम्बेसेडरसुद्धा आहे. त्यामुळेच की काय तिची लोकप्रियता आणखी वाढत चालली आहे. जाहिरात क्षेत्रातही अमांडाचा डंका वाजताना पाहायला मिळतोय. विविध बड्या कंपन्यांचे स्वीम सूट्स आणि इतर उत्पादनांच्या जाहिराती तिने केल्या आहेत. फिटनेस हा अमांडासाठी आवडीचा विषय आहे. त्यामुळेच की काय फिटेनसकडे अमांडा कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही.

लाचखोर शेळके, फडला चार दिवसांची पोलीस कोठडी!

0

बीड: एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व कारकूर बब्रुवाहन फड यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांच्याही घरांची झडती घेणे सुरू असून रोख रक्कम व एफ. डी. सापडली. अजून काही बराच घबाड सापडण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके याच्याकडे एका वादाची सुनावणी सुरू होती. याचा निकाल बाजुने देण्यासाठी शेळकेने दोन लाख रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने याची तक्रार बीड एसबीकडे केली. त्यांनी सापळा लावून लाच स्विकारताना कारकुन बब्रुवाहन फडसह शेळकेला रंगेहाथ  पकडले होते. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, कारवाई होताच शेळकेच्या औरंगाबाद येथील घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली. यामध्ये रोख रक्कम, सोने, चांदी, लाखो रूपयांच्या एफ.डी.आढळून आल्या होत्या. शुक्रवारीही फड व शेळकेच्या घरांची झडती घेणे एसीबीकडून  सुरूच होते. बीडमधील घरांमध्येही रोख रक्कम व एफ.डी.आढळल्याचे एसीबीतील सूत्रांनी सांगितले. एकुण किती आणि काय काय मिळाले, याची सविस्तर माहिती येण्यासाठी आणखी एक दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबादेतील नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या!

0

नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण कार्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीने शुक्रवारी २३ मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी एकनाथ जाधव (२१,रा़ औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक – पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ समाजकल्याण विभागाचे विभागीय कार्यालय आहे़ या कार्यालयाजवळच मुलींचे वसतीगृह असून या ठिकाणी गौरी जाधव ही विद्यार्थिनी राहत होती़ नाशिक शहरातील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या गौरीने दुपारच्या सुमारास वसतीगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ मुंबई नाका पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली़

मुंबई नाका पोलीस शासकीय वसतीगृहात पोहोचल्यानंतर त्यांनी गौरीने आत्महत्या केलेल्या खोलीची तपासणी केली़ गौरीने आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, गौरी जाधवच्या आत्महत्येचे खरे कारण पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मोदींचा पराभव करण्यासाठी ‘चेहऱ्याची’ गरज काय!

0

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारविरोधात महाआघाडीसाठी कुठल्याही चेहऱ्याची आवश्यकता नाही, असे म्हणत सन १९७७ मध्येही इंदिरा गांधींविरोधात एकही चेहरा नव्हता. पण तरीही त्यांचा पराभव झालाच. त्यामुळे मोदींच्या पराभवासाठी चेहऱ्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच मोदींमुळे विरोधकांमध्ये एकता दिसून येत आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत भाजपाविरोधात आघाडी स्थापन करण्यास ही वेळ योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत राजकारण खूप मोठं असतं, असेही शौरी यांनी स्पष्ट केले. ‘एनडीटीव्ही’शी ते बोलत होते. तब्बल २५ वर्षांनंतर बसप-सपा एकत्र आल्यामुळे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. याबाबत शौरी म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकमेकांशी हातमिळवणी केली पाहिजे. शौरी हे एकेकाळी मोदींचे प्रशंसक होते.

मोदींनी विरोधी पक्षाविरोधात सुरू केलेल्या अभियानाविरोधात त्यांनी टीका केली. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मोदी कठोर मेहनत घेत आहेत. तुमच्यातील प्रत्येकाला नेस्तनाबूत केले जाईल, असे मोदींनी विरोधकांना सांगून टाकले आहे. तुम्ही सर्वजण एकत्र आला नाहीत तर तुम्हाला आमच्यापासून धोका राहील, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. विरोधी पक्षच नाही तर भाजपाच्या सहकारी पक्षांनाही मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले तर त्यांचेही पतन होईल, असे वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला.