होम देश कोची शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू

कोची शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ४ जणांचा मृत्यू

8
0
शेयर

केरळ : केरळच्या कोची शिपयार्ड इथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या सागर भूषणजहाजावर झालेल्या स्फोटामुळे चार कामगार ठार तर १३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.

स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोची शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. अजूनही दोन कामगार त्या टाकीत असल्याचे समजते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत. महाशिवरात्री असल्यामुळे कोची शिपयार्ड आज बंद आहे. पण दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here