LATEST ARTICLES

प्रफुल पटेल ह्यांनी एबिना एंटरटेनमेंट निर्मित ‘धर्मरावबाबा आत्राम’ह्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला

dhamarao baba atram, trailer launch, praful patel

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची जीवन कथा लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून दर्शकांसमोर आणण्यात येत आहे. ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ हा चित्रपट एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित झाला आहे आणि या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये झाला. अतिशय उत्सवात राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल उपस्थित होते. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी आणि निर्माती नीतू जोशी. चित्रपटात धर्मरावबाबा आत्राम यांच्या तरुण वयातील पात्र अभिनेता जितेश मोरे यांनी केला आहे.

या भव्य कार्यक्रमात, अनेक विशेष लोकांची उपस्थित होती, ज्यात, मंत्री अनिल पाटिल, मंत्री अदिति सुनील तटकरे,आमदार संदीप धुर्वे,दिनेश वाघमारे, अभिमन्यु, आणि निशा जामवाल यांचे समावेश होता. नीतू जोशी यांनी सर्व अतिथींना पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. सर्वांना चित्रपटाचा ट्रेलर आवडला.

प्रफुल पटेल म्हणाले, “मला माहित नव्हतं की बाबा अभिनय करू शकतात. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या देशाचं आणि ह्या राज्याचा हीरा लोकांना परियंत पोहोचायचं काम होतंय ह्याचा मनस्वी आनंद आहे. बाबा जी अहेरीचे राजा आहेत. अहेरी हे एक आदिवासी क्षेत्र आहे आणि ते त्याच्या राज  कुटुंबातून आहेत. त्यांच वय अगदी १४ वर्ष असतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला त्या नंतर खरा खडतर प्रवास हा बाबांचा सुरु झाला,आज ह्या स्थरापर्यंत येण्यासाठी प्रचंड  संघर्ष करावा लागलाय बाबांना. त्यांच्या जीवनातील विविध घटना या चित्रपटात दाखवला गेलाय.मी आज ट्रेलर  बघुन खुप खुश आहे, पण चित्रपट अजून बाकी आहे. आम्ही सर्व काही त्याग करुन आज इथं परियंत आलोय आणि तपस्या केल्याशिवाय काही मिळाऊ शकत नाही. बाबा राज्याच्या मागासलेला व दुर्गम भागातुन आहेत, परंतु त्यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासींच्या जीवनात किती मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलं आहे ये तेथील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. त्यांनी लाखों माणसांचे जीवन बदलले आहे. मी नितू जोशी यांना शुभेच्छा देतो.”

निर्माती नीतू जोशी यांनी म्हणाले, “या चित्रपटाचे तयार होण्याच्या काळात, मी बाबांना जवळुन ओळखलं, त्यांच्या संघर्षांना समजता आलं, त्यांच्या समाजातील दायित्वाचं आणि योगदान अनुभवलं. या चित्रपटातून मी नव्या पिढिला चांगले संदेश देण आणि त्यांना जीवनात उल्लेखनीय कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते. बाबांच्या बाबतीतून काही सांगायला झाल तर. 

मी नक्षलग्रस्त भागात गेले आणि बाबांबद्दल तेथील थरार  सांगायला मिळाला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र १४ वर्षांच्या बाबांचा त्यांच्या संघर्ष आणि कामाचा आढावा ऐकून मी या चित्रपट बनवण्यासाठी निर्णय घेतला. या चित्रपटात, आदिवासी भागातून राज्य मंत्री बनण्याचं बाबांचं प्रवास दाखवलं आहे.”

मंत्री धर्मरावबाबा आत्राम  म्हणाले, “मला नवीन जीवन मिळालं. नक्सलवादींच्या छापांपासून बाहेर पडलो, नदी नाल्यातून पाणी प्यायचो,माहित नव्हतं की जंगला बाहेर निघणारा की नाही. ह्या सर्व प्रवासाचं आणि संघर्षाची घटना चित्रपटातून दाखवला आहे.”

दिग्दर्शक भुषण अरुण चौधरी म्हणाले, “आजही बाबा ह्या वयात प्रचंड उत्साहात असतात, आणि त्यांच्या उत्साह बघुन माझ्यावर असलेला प्रेशर हा थोडा कमी झाला. चित्रपटात जितेश मोरे यांनी तरुण बाबांचा पात्र केलंय जितेश हा अतिशय अभ्यासु अभिनेता आहे त्यानी बाबांच आयुष्य खुप सुंदर रेखाटलय आपल्या अभिनयातुन . ह्या चित्रपटाचं निर्माण होन माझं स्वप्न होतं.”

अभिनेता जितेश मोरे म्हणाले, “मला हे पात्र साकारायला मिळणं हे खरं तर माझ्यासाठी भाग्यचं म्हणाव लागेल कारण खुप संभाळून आणि अभ्यासपूर्व ह्यात मला काम कराव लागलं. मला शुटींग दरम्यान अनेक लोकांनी बाबांचा तरुण पानाचा संदर्भ दिला. तर ते रेखाटण्याचं दबाव वेगळा होता माझ्यासाठी, आणि दिग्दर्शकाने  माझं काम खुप सोपं केलं.” या प्रसंगात, जितेश मोरे चित्रपटातील एका वाक्याचं उल्लेख केला,जे बाबांचं घोष वाक्य आहे, “जल,जंगल,जमीन हमारा है और ये जमीन मालीकाना हक़ हमारा अधिकार है.”

ही जीवन कथा ह्या नव्या पिढीला एक नवीन दिशा व ऊर्जा नक्कीच देईल अशी आशा आहे.

Web title: Praful Patel launched the trailer of Ebina Entertainment’s ‘Dharmarao Baba Atram’

संत बाळूमामा देवस्थानचे संभाव्य सरकारीकरण रहित करून गैरव्यवहारांच्या प्रकरणांची तात्काळ CID चौकशी करा

balu mama, balu, संत बाळूमामा देवस्थानचे, संत बाळूमामा

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्‍वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संत बाळूमामा देवस्थानच्या देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी, तसेच संभाव्य सरकारीकरण  रहित करून   मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे, अशी एकमुखी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाद्वारे करण्यात आली. ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था’, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित या मोर्चासाठी 600 हून अधिक भक्तांची उपस्थिती होती. मोर्चाच्या अंती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या मोर्चात पिवळा भंडारा लावून, तसेच घंटा आणि ढोल वाजवत भक्तगण सहभागी झाले होते. ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत हे संत बाळूमामा यांची वेशभूषा करून मोर्चात सहभागी झाले होते.

या प्रसंगी  ‘नाही होऊ देणार, नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण, नाही होऊ देणार’, ‘मशीद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी, तर मग बाळूमामांच्या मंदिराचेच सरकारीकरण का?’, ‘बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे’, ‘नको शासक नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक !’ यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला. 

मोर्चाच्या समारोपप्रसंगी बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष श्री. निखिल मोहिते-कुराडे म्हणाले, ‘‘संत बाळूमामा देवस्थानमध्ये प्रशासक नेमल्याचे दुष्परिणाम भाविक-भक्त सध्या भोगत आहेत. बाळूमामांच्या बग्यातील ज्या बकर्‍या आजारी पडतात त्यांना पहाण्यासाठी डॉक्टर नाहीत, त्यांना वेळेवर औषधे मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. संत बाळूमामांच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, भाविकांसाठी प्रसाधनगृह नाही, प्रसादाची गैरसोय होते यांसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.’’ उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘मंदिरावर प्रशासक नेमून भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा हडप करण्याचे षडयंत्र भक्तगण उधळून लावतील.’’

या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘वर्ष 1966 ला संत बाळूमामा यांचे समाधी मंदिर स्थापन झाले आणि वर्ष 2003  मध्ये पहिल्यांदा विश्‍वस्त मंडळ अस्तित्वात आले. विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्याच्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थाकडे नेम्या किती जमिनी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांची चौकशी ही झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे. गेले 3 महिने बकर्‍यांची विक्री बंद आहे; त्यामुळे मंदिराचे जे कोट्यवधी रुपयांचे जे उत्पन्न बुडत आहे त्याला जे उत्तरदायी आहेत त्यांच्यावर कधी कारवाई होणार ? त्यामुळे हे मंदिर प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.’’ या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, सर्वश्री गजानन तोडकर, किरण कुलकर्णी, रामभाऊ मेथे, सुनील सावंत यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर – ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थे’चे अध्यक्ष श्री. निखिल मोहिते-कुराडे, उपाध्यक्ष मानतेश नाईक, दयानंद कोनकेरी, सरदार खाडे, सिद्धार्थ एडके, संजय शेंडे, सागर पाटील, देवदास शिंदे, संत बाळूमामा यांची प्रत्यक्ष सेवा केलेले भक्त चंदूलाल शहा-शेठजी यांचे पणतू परेश शहा-शेठजीबजरंग दलाचे श्री. पराग फडणीस आणि श्री. अक्षय ओतारी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजान तोडकर,  भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, उद्धव ठाकरे गटाचे करवी रतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, यांसह नागाव, शिरोली, भुये, शिये, निगवे, मुदाळ या गावातून धर्मप्रेमी, भक्त उपस्थित होते.

एकतर OTT वर बंदी आणा किंवा अश्लील धारावाहिक नियंत्रित करा

मीरा रोडच्या एका सोसायटीत ही घटना घडली आहे, 8 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी शेजारी राहतात आणि त्यांचे आई-वडील दोघेही कामावर जात असल्याने ते शाळा सुटल्यानंतर घरी एकटेच राहतात. अर्थात, शेजारी त्यांच्यावर लक्ष ठेवत असत, पण आजची मुलं लहानपणापासूनच इतकी स्वतंत्र आहेत की त्यांना कोणाच्याही मदतीची गरज भासत नाही. दोघेही दिवसभर आपल्या मोबाईलवर काहीतरी बघत बसायचे. एके दिवशी जेव्हा त्यांची मोलकरीण अचानक घरात आली तेव्हा तिच्या लक्षात आले की दोघेही काही घाणेरडे चित्रपट पाहत आहेत आणि ते एकमेकांच्या अंगावर पडलेले आहेत. महिलेने आत प्रवेश करताच दोघेही घाबरले. दुसऱ्या दिवशी तिने त्या मुलांच्या पालकांना माहिती दिली, वडिलांनी मोबाईलकडे पाहिले असता मुले काय बघत आहेत हे पाहून त्यांना धक्काच बसला. ते रोज ओटीटीवर अश्लील मालिका पाहायचे. एका कॉमन फ्रेंडमुळे हि घटना माझ्या कानावर आली , मुलांना समुपदेशनासाठी पाठवले गेले आणि पालकांनी त्यांना ताकीद पण दिला, पण मला खात्री आहे की गोष्टी इथेच थांबणार नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्म ची काळी बाजू या पिढीला बिघडवत राहणार.

OTT प्लॅटफॉर्म एक्सप्लोर करताना मुलांना चुकून वयानुसार अयोग्य मालिका बघतात आणि मग त्यांच्यात कुतूहल निर्माण होते आणि ते कुतूहल त्यांना व्यसनाधीन बनवते. मुंबईत जवळपास मुलं घरी एकटीच राहतात आणि आई-वडील कामावर जातात, प्रत्येकाची स्वतःची आर्थिक समस्या असते एकतर ते मुलांना शेजारी किंवा मोलकरणीच्या जीवावर सोडतात किंवा शेजारची सगळी मुलं एकत्र राहतात. अशा वेळी कोण काय करेल याची शाश्वती नसते. विभक्त कुटुंबात मुलांना काय चांगलं आणि वाईट काय हे सांगायला कुणीच नसतं. त्यांचे मानसिक संतुलन लहानपणापासूनच बिघडते, आणि ते त्यांच्या वया पेक्षा जास्त मोठे होऊ लागतात.OTT सहज उपलब्ध असल्याने, पालक घरी नसताना नसताना ते कोणत्या प्रकारची सामग्री पाहत आहेत याची आम्हाला कदाचित माहिती नसते.

ओटीटी स्ट्रीमिंगचे व्यसन ही एक सामान्य भीती आहे, कारण लोक सहसा त्यांच्या आवडत्या शो मध्ये बरेच तास मग्न असतात. या व्यसनाधीन वर्तनामुळे उत्पादकता कमी होऊ शकते, सामाजिक क्रियाकलापांपासून अलिप्तता येते आणि काही प्रकरणांमध्ये लोक एकटी राहायला सुरवात करतात आणि इथूनच मानसिक आजार पण व्हायला लागतात . निर्विवादपणे, लोक OTT प्लॅटफॉर्मवर बराच काही बघू शकतात. या प्लॅटफॉर्मने त्यांच्या प्रेक्षकांसाठी अगणित सामग्री आणि निवडी उघड केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सामग्रीचा पुरवठा आणि मागणी प्रचंड आहे.

भारत हा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक संवेदनशीलता असलेला मूल्ये आणि नैतिकतेचा देश आहे. जेव्हा OTT प्लॅटफॉर्मवरील मजकूर आक्षेपार्ह, अनादरपूर्ण किंवा पारंपारिक मूल्यांच्या विरुद्ध असेल तेव्हा चिंता निर्माण होते, ज्यामुळे संभाव्य सामाजिक आणि सांस्कृतिक दबाव निर्माण होतो. OTT प्लॅटफॉर्मवरील दुर्दैवी किंवा अश्लील सामग्रीचा मुलांवर आणि तरुण प्रेक्षकांवर परिणाम होऊ शकतो. अल्पवयीन दर्शकांचे वय-अयोग्य सामग्री आणि त्यांच्या वागणुकीवर, वृत्तीवर आणि नैतिक मूल्यांवर होणाऱ्या संभाव्य प्रभावाविषयी चिंता वाटते.

या चिंतेला प्रतिसाद म्हणून, भारत सरकारने OTT प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचे नियमन करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम लागू केले आहेत. माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 चे उद्दिष्ट जबाबदार सामग्री नियंत्रण सुनिश्चित करणे, तक्रार निवारण यंत्रणा स्थापित करणे आणि स्पष्ट, आक्षेपार्ह किंवा अश्लील सामग्रीशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अश्लील किंवा असभ्य सामग्री कशाची आहे याची समज लोक आणि समाजांमध्ये भिन्न असू शकते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सामाजिक भावनांशी न खेळणे हे आव्हान आहे. भारताच्या विकसनशील डिजिटल मीडिया लँडस्केपमध्ये विनियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी आणि परिणाम हा वादाचा आणि चर्चेचा विषय राहील. नियम बनवले जातात पण तरीही स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास उल्लंघन केले जातात। आपण खरोखर विचार केल्यास आपल्या घरातील मुलांना अशा प्रकारचे कार्यक्रम बघायची सवय पडली आहे आणि काही गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्यात ह्याच वाईट वाटले पाहिजे.

समस्या अशी आहे की केवळ प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना व्यसनाधीन करण्या साठी OTT हे कुठल्याही स्तराला जाऊ शकत। असभ्य आणि अश्लील सामग्री समाजाच्या संस्कारबध्ध संरचने साठी धोकादायक आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की बलात्कार आणि गुन्हे केलेल्या अनेक गुन्हेगारांनी गुन्हा करण्याच्या आधी OTT वर पाहिलेल्या मालिका बघूनच प्रेरणा घेतली होती।। दुसरी मोठी समस्या ही आहे की त्यात वयाच्या निर्धारणासाठी योग्य नियम नाहीत ज्यामुळे लहान मुले अशा गोष्टी आवर्जून पाहतात आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ही मुले या राष्ट्राचे भविष्य आहेत आणि ते आपल्यासाठी खरोखर हानिकारक ठरू शकतात. अनियंत्रित किंवा राष्ट्राची एकोपा नष्ट करणारी (हिंसा भडकावून) किंवा भारतीय सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारी किंवा तेथील लोकांच्या सद्भावनेत बसत नसलेली गोष्ट, ह्यावर सरकारने त्यावर बंदी घालावी.

25 फेब्रुवारी रोजी “सेव्ह भारत सेव्ह कल्चर फाऊंडेशन” आणि “हिंदु जनजागृती समितीने” भारत मातेला सांस्कृतिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ते “Misdeeds of OTT & Filmy Dunia – वाढत्या बलात्काराचे प्रमुख कारण ” यावर चर्चा करणार आहेत. आपण एक जिम्मेदार नागरिक आहेत ह्या नात्यांनी अश्या मोहिमांना साथ देऊन , समाजाचं संरक्षण आपण करायलाच पाहिजे।

देहराडून येथे २०२४ चा हिंदुत्व के आधार स्तंभ आणि देवभूमी रत्न पुरस्कार कार्यक्रम सोहळा

devbhoomi ratna, pillars of hindutva, hindutva ke adharstamb

मुंबई येथील वेद रिसर्च अँड फाऊंडेशनच्या वतीने देहरादून (उत्तराखंड ) येथे १४ फेब्रुवारी २०२४ रोजी हा कार्यक्रम झाला
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडचे प्रथम मुख्यमंत्री, मा. भगतसिंह कोश्यारीजी तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री श्री.तीरथसिंह रावत, श्री.आत्मानंदजी महाराज व उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री श्री.सत्यपालजी महाराज, उमाकांतनंदजी महाराज संस्थेच्या अध्यक्षा डॉ वैदेही तामण यांच्या शुभहस्ते प्रदान सोहळा झाला.


“हिंदुत्व के आधार स्तंभ २०२४” आणि देवभूमी रत्न पुरस्कार या पुरस्काराने अनेक संत , महंत, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक राष्ट्रीय कार्यात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.


मुंबईचे खासदार श्री.गोपालजी शेट्टी, उज्जैनचे गुरुवर्य विठ्ठलराव गोलांडे, हभप साहिल महाराज शेख, (मुळचे वारजे येथील) हभप उदबोध पैठणकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.


याप्रसंगी कलीेकानंद सरस्वती, काश्मीर येथील प्रख्यात डॉक्टर मसूद इकबाल झरगर, उत्तराखंड मधील प्रसिद्ध गायक प्रीतम भरद्वाज आहेत, नाशिक येथील शिवगोरक्ष योगपिठ आयुर्वेद संस्थेचे शिवानंद महाराज, बुलढाणा येथील वेदमूर्ती उधबोध महाराज पैठणकर, असे अनेक मान्यवर संत महंत हजर होते.


त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या 21 वैदिक शिक्षकांचा विशेष सन्मानही करण्यात आला
तसेच पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोरे , सनातन संस्थेचे अभय वर्तक , चेतन राजहंस, गीता प्रेस गोरखपूरचे प्रतिनिधी यांचाही त्यांच्या विशेष सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.


मुंबईच्या पत्रकार आणि वेद रिसर्च फौंडेशनच्या प्रमुख डॉ. वैदेही तामन यांनी कार्यक्रमाचे आयोजन  केले होते.

मुंबईच्या इतिहासात प्रथमच 25 डिसेंबर रोजी समुद्र आरतीचे आयोजन करण्यात आले होते

हिंदू संस्कृती अद्वितीय आणि व्यापक आहे, येथे वृक्ष, वनस्पती, पक्षी, प्राणी, माती आणि पाणी यांच्या पूजेला पवित्र स्थान देण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी वेदांत योगी श्री कालिकानंद सरस्वती जी, अरविंद मोहन नगर जी, दयानिधी शरण जी आणि सनातन  सेवा  न्यास चे  प्रेसिडेंट शिवोम  मिश्रा  जी यांनी समुद्र आरतीचे आयोजन केले होते. हे एक अतिशय आध्यात्मिक दृश्य होते ज्यात वैदिक मंत्र, प्रार्थना आणि पवित्र विधी समाविष्ट होत्या. योगी कालिकानंद सरस्वती जी म्हणाले, “जेव्हा धार्मिक गुरु प्रार्थना करतात तेव्हा त्याचे आशीर्वाद संपूर्ण विश्वात पोहोचतात. भजन ही खरी भक्ती आहे. मुंबईने समुद्र प्रार्थनेसाठी हा दिवस निवडला याचा मला आनंद आहे. जय सनातन.” हिंदू धर्मात, समुद्र प्रार्थनेला अतिशय शुभ मानले जाते, आणि समुद्राची पूजा करणे हे मानवाची आध्यात्मिक पातळी वाढवण्याचे एक साधन मानले जाते. यावेळी दरवर्षी 25 डिसेंबर हा समुद्र आरती दिन म्हणून साजरा करण्याचा ठरावही घेण्यात आला. सुफी संत अरविंद नांगर जी म्हणाले की, मी भारतभर भ्रमण करेन आणि समुद्र महा आरती चे आयोजन  करेन जेणेकरून आपल्या देशबांधवांमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी आणि लोकांना समुद्राची धार्मिक विशालता समजावी. समुद्राला केवळ पर्यटन स्थळ न मानता धार्मिक भावनेने तो कसा स्वच्छ व सुंदर बनवला पाहिजे, याचीही माहिती ते देतील. मुंबईचा सर्वात मोठा भाग असलेल्या समुद्राचा आशीर्वाद घेण्यासाठी समुद्र पूजा केली जाते.” जुहू चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरेच भाविक इथे भाजनामध्ये लिन होऊन समुद्र देवतेला प्रसन्न करण्याचा आनंद घेत होते।  सुफी संत श्री अरविंद नगर जी म्हणाले, “समुद्र आरती करून येथे निर्माण झालेले वातावरण अप्रतिम होते. ख्रिसमस चा सांता कोण आहे हे सांगण्यासाठी मुलांना समुद्र किनाऱ्यावर फिरायला आणले जाते, परंतु समुद्राविषयी धार्मिक श्रद्धा आहेत हे कधीच सांगितले गेले नाही. मी “लोकांनी दरवर्षी 25 डिसेंबर हा समुद्र आरती दिवस म्हणून साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. मी भारतभर प्रवास करीन आणि समुद्र प्रार्थना करेन जेणेकरून भारतातील लोकांमध्ये शांती, समृद्धी आणि सद्भावना नांदेल.” योगी दयानिधी शरण म्हणाले, “एक धर्मगुरूया नात्याने सनातन धर्माच्या दिशेने माझे हे छोटेसे योगदान आहे. आणि हिंदू धर्माची विशाल संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे काम आम्ही करू.” या कार्यक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मुंबईत होणारी ही पहिली समुद्र महाआरती होती.

सप्तर्षि पुरस्कार शृंखला 29 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणार आहे

हिंदू रिसर्च फाऊंडेशन, सन २००० पासून राष्ट्रीय स्तरावर काम करणारी मुंबई येथे पंजीबद्ध सार्वजनिक धर्मार्थ संस्था आहे. सदर संस्थेद्वारे हिंदू धर्माचे विविध स्तरावर कामे सुरू आहेत. भारतीय संस्कृतीचे दुर्भाग्य की प्राचीन भारतातील ज्या ऋषि-मुनिंनी साहित्य, कला, विज्ञान व विज्ञान इत्यादि विविध क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केली आहे परंतु त्यासंबंधी भारतीय समाज अनभिज्ञ आहे. त्यारूषी मुनींच्या कार्याची माहिती भरतीयास व विश्वास व्हावी या हेतूने त्यांचे नावे पुरस्कार देण्याचे ह्या संस्थेने निश्चित केले आहे. भारतीय संस्कृतीतील अशा सात ऋषींच्या नांवे (यादी सोबत जोडली आहे) त्या त्या क्षेत्रात समस्त मानवकल्याणासाठी निरपेक्ष निस्वार्थ अजरामर योगदान व संशोधनाबाबत नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर सप्तर्षि पुरस्कार शृंखला च्या माध्यमाने पुरस्कार देण्याची संकल्पना आहे. सुरुवातीस भारतातील नामवंत/गणमान्य शात्रज्ञांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अशा पुरस्काराने सन्मानित करून तद्नंतर विश्वस्तरावर हि योजना नेण्याचे ठरले आहे. जेणेकरून विज्ञानाच्या क्षेत्रातील प्राचीन युगातील आमच्या पूर्वजांनी केलेल्या कामाचा परिचय जगास करून देता येईल. मागील वर्षी आचार्य भारद्वाज ह्या पुरस्काराने विकास इंजिन विकसित करून अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शास्त्रज्ञ पद्मभूषण श्री नांबी नारायनन यांना आचार्य भारद्वाज पुरस्काराने आणि रसायन शास्त्रात जागतिक कीर्ती मिळालेले व अद्वितीय कामगिरी करणारे पद्मविभूषण श्री रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. सदरचे दुसरे वर्ष आहे. यावर्षी साहित्य कला विज्ञान क्षेत्रातील खालील गनमान्य व्यक्तींना त्यांच्या नावासमोर दिलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराची राशी रुपये एक लाख व सन्मान पत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे.
  1. पद्म विभूषण श्री इ श्रीधरण, मेट्रो मॅन – विश्वकर्मा पुरस्कार
  2. पद्म विभूषण डॉ श्री के कस्तुरीररंगन – आचार्य भारद्वाज पुरस्कार
  3. पद्म विभूषण डॉ श्री अनिल काकोडकर – आचार्य कनाद पुरस्कार
  4. पद्म भूषण डॉ श्री विजय भाटकर – आर्यभट पुरस्कार
  5. पद्म श्री डॉ जी डी यादव – नागार्जुन पुरस्कार
  6. डॉ श्री अनमोल सोनवणे, ठाकूर – सुश्रुत पुरस्कार
  7. महाकवी श्री सुधाकर गायधनी – महर्षि वाल्मिकी पुरस्कार
ज्या ऋषि मुनींच्या नांवे सदर पुरस्कार दिले जाणार आहेत त्याच्या कार्याची माहिती सोबत जोडली आहे. तसेच ज्या मान्यवरांना पुरस्कार दिले जाणार आहेत त्यांच्या कार्याचीही संक्षिप्त माहिती आपल्या अवलोकनार्थ सोबत जोडली आहे. सदरचा कार्यक्रम रविवारी दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी ११०० वा कविकुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्टंट सिस्टम, आय टी पार्क, नागपूर येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाथ परंपरा आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथजी महाराज आणि प्रमुख अतिथि मा. श्री हरेराम त्रिपाठी असणार आहेत. सदर पुरस्कार वजा सत्कार सोहळ्यास व कार्यक्रमासाठी आपला सहभाग व उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा व प्रतिष्ठा वाढेल. तसेच ह्या नावीन्यपूर्ण उपक्रमासंबंधि आपल्या वृतपत्राद्वारे / समाजमध्यमाद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. विनीत हिंदू रिसर्च फाऊंडेशन 9820001954

गणेश चतुर्थी निमित्त श्री नाथ मंदिरातील श्री सिद्धिविनायक गणेशाची पूजा व आरती करण्यात आली

औसा: आज गणेश चतुर्थी निमित्त श्री नाथ मंदिरातील श्री सिद्धिविनायक गणेशाची पूजा व आरती करण्यात आली, तसेच सामुदायिक अथर्वशीर्ष पाठ संपन्न झाले, यावेळी सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज, श्री.गोरखनाथ महाराज, श्री.रविंद्रनाथ महाराज, श्री.श्रीरंग महाराज, श्री.नाथ महाराज, औसाचे तहसीलदार श्री.भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री.सुनील रजितवाड, नगर परिषद आयुक्त श्री.अजिंक्य रणदिवे, लातूरचे न्यायाधीश, श्री.गोविंदराव माकणे, श्री.पुरूषोत्तम जोशी गुरूजी यांच्यासह गणेश भक्त उपस्थित होते. Web title: On the occasion of Ganesh Chaturthi, aarti of Shri Siddhivinayak Ganesha in Shri Nath Temple was performed.

सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक संपन्न झाली

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची बैठक संपन्न झाली. औसा: सद्गुरू श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित तिन दिवसीय श्री गणेश यागास आज सकाळी प्रारंभ झाले, त्यावेळी ह.भ.प. श्री. श्रीरंग महाराज औसेकर व सौ. श्रध्दा श्रीरंग महाराज यांच्या हस्ते तसेच वेद शास्त्र संपन्न पंडित श्री. पुरूषोत्तम जोशी गुरूजी व त्यांच्या सहकारी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात श्री गणेश पूजा, अभिषेक व संकल्प विधी करण्यात आली. Web title: Committee meeting concluded under the chairmanship of Sadguru Shri Gahininath Maharaj Ausekar

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा १ मे रोजी मुंबईत!

Maha Vikas AaghadiMVA
VajraMuth Rally
Image: PTI
संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ह्याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, १ मे २०२३ रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार आहे. मुंबईत होणा-या ह्या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक ह्या नियोजनात सहभागी झाले आहेत. १ मे २०२३ रोजी, वांद्रे येथील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बि के सी येथे सायंकाळी ५.३० वाजता महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला सुरुवात होईल. राज्यभरात महाविकास आघाडीला मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मुंबईत कळस गाठेल आणि अतिभव्य अशी सभा होईल ह्याची आयोजनकर्त्यांना खात्री आहे.   Web Title: MVA’s ‘Vajramuth’ rally on 1st May in Mumbai

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश ;परदेशातील एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना शासनाने केली शिष्यवृत्ती पुन्हा बहाल

Supriya Sule
Image: PTI
राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी मिळते. यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबविली जाते.या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत शिवाय सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.   Web Title: MP Supriya Sule’s follow-up success; Govt reinstates scholarship to foreign ATKT holders