सरकारने हेरगिरीसाठी भारतीयांचे व्हाट्सअप मेसेज वाचले : जितेंद्र आव्हाड

0

Jitendra Awhadमुंबई : भारतीयांच्या हेरगिरीसाठी केंद्रातील मोदी सरकार इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेतली. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते, आणि पत्रकार यांच्या फोनमधले व्हाट्सअप मेसेज मे 2019 पर्यंत, त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा, व्हाट्सअपने इस्रायलच्या एन एस ओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये मोदी सरकार भारतीयांवर पाळत ठेवण्यासाठी इस्रायली तंत्रज्ञानाची मदत घेत असल्याचा गंभीर आरोप आमदार आव्हाड यांनी केला आहे.

फेसबुकवर पोस्टवर काय म्हटले आव्हाड…

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना दिलेल्या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्रायलच्या एनएसओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरू केले आहे. त्यामुळे सरकारनेच भारतीयांच्या खासगी जीवनात डोकावण्यास सुरुवात केली आहे. संविधानाने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकूमशाहीने रचला आहे. ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारू, असा इशारा आमदार आव्हाड यांनी दिला.

कांद्यानं साठी गाठली!

Onionमुंबई : मुंबई, पुणे, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. यामुळे सर्वसामान्यांची पंचाईत झाली आहे.

कांदा खराब होण्याच्या भीतीनं गेल्या वर्षीच अनेक शेतकऱ्यांनी कांदा विकून टाकला, त्यामुळे आताच्या हंगामात कांद्याची साठवण शिल्लक नाही. जो कांदा होता तो ही परतीच्या पावसामुळे साठवण केलेल्या चाळीत पाणी शिरल्याने कांदा सडला. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. शेतातला कांदा काढणीला येताच पावसानं हजेरी लावली त्यामुळे कांदा काढणी लांबणीवर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातला लाल कांदाही खराब होण्याची भीती आहे.

कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून परदेशातून कांदा आयात करण्यात आला. आयात कांदा वातावरणात टिकला नाही म्हणून त्याला उठाव नाही. डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.

तर काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल – पृथ्वीराज चव्हाण

0

Prithviraj Chavanमुंबई : भाजप-शिवसेनेतील सत्तास्थापनेच्या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत. शिवसेनेकडून पाठिंब्याबाबत प्रस्ताव आल्यास हा प्रस्ताव पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे घेऊन आम्ही जाऊ, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

भाजप – शिवसेना युतीला जनतेने कौल दिला. आठ दिवस उलटले तरी सुध्दा त्यांनी सरकार स्थापण्यासाठी पुढाकार घेतला नाही. शिवसेनेने पाठिंब्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव दिला तर निश्चितच त्याचा विचार करण्यात येईल. हा प्रस्ताव हायकमांडपुढे मांडून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल’, असे नमूद करत पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत पुन्हा दिले आहेत. यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू : आ. बाळासाहेब थोरात

0

मुंबई : राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण सर्व जण मिळून जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आज दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक प्रेदशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनीताई पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तामिळनाडूचे प्रभारी संजय दत्त, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, आ. डॉ. विश्वजीत कदम, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, खा.बाळू धानोरकर, के. सी. पडवी किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अमित देशमुख, वर्षा गायकवाड, संपतकुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप, चेला वामशी रेड्डी, विधीनपरिषदेतील काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत आमदार उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल नवनिर्वाचीत आमदारांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे व आ. बाळासाहेब थोरात यांनी नवनिर्वाचीत आमदारांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी परिश्रम घेऊन या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आमदार म्हणून आपल्या सर्वांची आहे. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. परतीच्या पावसामुळे खरीप वाया गेले आहे. त्या शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आ. थोरात म्हणाले. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही नवनिर्वाचीत आमदारांना शुभेच्छा दिल्या.

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून उध्दव ठाकरे संतापले

0
मुंबई : पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे चांगलेच संतापले. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करायला नको होतं असं बैठकीत सांगितले.
मी मित्रपक्षाला मित्रपक्षच मानतो शत्रूपक्ष मानत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं.
पत्रकारांना भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान आज शिवसेनेच्या बैठकीत माझं अमित शाह यांच्यासोबत जे काही ठरलं आहे ते करावं आम्ही स्थिर सरकार देऊ. मी मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही. मला खात्री आहे सगळं काही सुरळीत होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महायुतीच्या चार घटकपक्षांची मंत्रीपदासाठी आडकाठी

0
ramdas athawaleमुंबई : शिवसेना भाजपमध्ये सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरु असताना महायुतीमधील घटक पक्ष रिपाइं,शिवसंग्राम, रासपा,रयत क्रांती संघटना या चारही घटक पक्षांना मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे उपस्थितीत होते. आठ दिवस उलटूनही महायुतीकडे बहुमत असताना सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे शिवसेना भाजपात वाद सुरु असताना घटक पक्षांनी सत्तास्थापन होण्याआधीच चारही घटकपक्षांना मंत्रीपद देण्याची मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी आठवले यांनी महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. शिवसेनेनं इतर विचार करु नये अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे

0
मुंबई : आमदार एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड शिवसेना भवनात आज बैठकीत झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सर्व आमदार उपस्थितीत होते.
आज शिवसेना भवनात शिवसेना आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सर्व आमदारांनी एकमातांनी निवड शिंदेंची निवड केली. शिवसेनेचे 56 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे संख्याबळ 60 वर पोहोचली आहे.
सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या वाटपावरून वाद सुरु आहे. यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेनं सर्व पर्याय खुले आहेत असे सांगितल्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

शिवसेनेचं शिष्टमंडळ भाजपावर दबावतंत्रासाठी राज्यपालांकडे जाणार

0
shivsena udhhavमुंबई : भाजपा शिवसेनेमध्ये सत्तासमान वाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपावर दबावतंत्रासाठी शिवसेनचं शिष्ठमंडळ आज दुपारी 3:30 वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.
यावेळी शिवसेनेचे विधीमंडळाचे नवर्निवाचीत गटनेते एकनाथ शिंदे, आमदार आदीत्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहेत. मात्र, शिवसेना सत्तास्थापण्यासाठी भेट नव्हे तर राज्यातील अनेक प्रलंबित आहेत. त्यासाठी आमचं शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती चांदिवलीचे आमदार लांडगे मामा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

१०० स्मार्ट सिटीच्या गाजरानंतर सरकारचं १०० विमानतळाचं गाजर

pm modi says open 100 additional airports in the next five years
पाच वर्षांमध्ये १०० ‘स्मार्ट शहरं’ उभारण्याचं वचन मोदी सरकारने २०१५ साली दिलं होतं. परंतु ते वचन पूर्ण झालं नाही. आता मोदी सरकार २०२४ पर्यंत देशभरात नवीन १०० विमानतळ बनवण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे १०० ‘स्मार्ट शहरं’च काय झालं असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने काम करणे सुरू केले आहे. सरकार २०२४ पर्यंत देशभरात नवीन १०० विमानतळ बनवण्याचा विचार करीत आहे. सरकार हा निर्णय लवकरच घेणार असून एक हजार नवीन मार्ग बनवण्याचाही विचार करीत आहे. हे मार्ग छोट्या शहरांना तसेच गावांना जोडण्याचे काम करणार आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत २०२५ पर्यंत गरजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्यात आली. देशात विमान भाडे फायनान्सियल बिझनेस यावरही चर्चा करण्यात आली. नवीन विमानतळ सुरू करण्याबरोबरच प्रत्येक वर्षी ६०० पायलट यांना स्थानिक स्तरांवर प्रशिक्षित करण्याचा प्रस्ताव दिला जाईल. तसेच पाच वर्षात विमानांची संख्या दुप्पट करून ती १२०० पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, यावरही चर्चा करण्यात आली आहे.

अखेर जम्मू काश्मीर, लडाख आजपासून केंद्रशासित प्रदेश

Finally Jammu Kashmir Ladakh has became Union territory
नवी दिल्ली : ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून ‘कलम ३७०’ आणि ‘३५ ए’ हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तब्बल 87 दिवसानंतर जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांची आजची पहाट एक राज्य नाही तर केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांच्या रूपात झाली आहे.

भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी हा मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानूसार लोकसभेत मंजूर झालेल्या जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयकानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख मध्यरात्री १२ वाजल्यापासून केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. त्यामुळे आता आता राज्यांची संख्या २८ झाली आहे. तर एकूण ९ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.

जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा समाप्त करून त्याऐवजी जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या बदलांबरोबरच आजपासून या ठिकाणी मोठे बदलही दिसणार आहेत. यापुढे जम्मू काश्मीरचे स्वत:चे संविधान आणि कोणताही स्वतंत्र झेंडा नसेल. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जी.सी.मुर्मू आणि लडाखमध्ये आर.के माथूर यांची उपराज्यपालपदी नियुक्ती केली आहे. लडाखच्या उपराज्यपालपदी विराजमान होणाऱ्या माथूर यांचा शपथविधीही पूर्ण झाला आहे.

हे बदल झाले…

यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये १११ विधानसभेच्या जागा होत्या. त्यापैकी ४ लडाखच्या होत्या. परंतु आता हे संपुष्टात येणार आहे. प्रशासनिक आणि राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने या ठिकाणी बदल होणार आहे. केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या १०७ जागा असतील. परंतु त्या ११४ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यापैकी ८३ जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तर दोन जागा नामनिर्देशन पत्राद्वारे भरल्या जाणार आहेत. तर २४ जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद होती. परंतु यापुढे आता या ठिकाणी केवळ विधानसभाच असणार आहे.

लडाखमध्ये विधानसभा नाही, उपराज्यपाल कामकाज बघतील…

लडाखमध्ये विधानसभा राहणार नाही. या ठिकाणी चंढीगड मॉडेल लागू करण्यात आलं आहे. या ठिकाणी लोकसभेची एक जागा, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, परंतु विधानसभा नसेल. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून उपराज्यपाल कामकाजं बघतीलं.