होम आरोग्य अशाप्रकारे चेहऱ्यावरील केस काढू शकता!

अशाप्रकारे चेहऱ्यावरील केस काढू शकता!

66
0

आपल्या त्वचेसाठी बहुतांश स्त्रिया पार्लरमध्ये जातात. पार्लरमधील अनेक अनैसर्गिक गोष्टींचे दुष्परिणामही होतात. चेहऱ्यावरील अनावश्यक केस हीदेखील अशी समस्या आहे ज्यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये जातात. परंतु ही समस्या जर नैसर्गिकरित्या आपण घरी सोडवू शकतो.

हळद – दक्षिण भारतातील अनेक स्त्रिया चेहऱ्यावर हळदीचा लेप लावतात. यामुळे चेहऱ्यावर केस उगवत नाही व त्वचा उजळते. रोज पाच ते दहा मिनिटे हळदीचा लेप लावा.
बेसन – बेसन फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम होऊन चेहऱ्यावरील केसही निघून जातात. बेसनात चिमूटभर हळद मिसळून पाणी घालून फेलपॅक बनवा व चेहऱ्याला लावा.
शुगर वॅक्स – चेहऱ्यावर केस अधिकच जास्त असतील तर नैसर्गिक वॅक्स करा. साखर वितळून त्यात मध व लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून वॅक्सप्रमाणे स्वच्छ करा.