कडू कारल्याचे असे आहेत फायदे?

- Advertisement -

हिरव्या भाज्यांमधील सगळ्यात पोषक भाजी आहे कारलं. याची चव कडू असली तरी अनेकांना हे आवडत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का कारलं हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं.

१. रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते, खाल्लेलं पचायला  मदत होते.  कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी होण्यास मदत होते.

२. कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, एक ग्लास कारल्याचा रस आणि त्यात अर्ध लिंबू टाकून प्यायल्याने आजारावर मात करण्याची ताकद आपल्या शरीराला मिळते. कारल्याच्या रसाने त्वचारोगावर नियंत्रण राहते.

- Advertisement -

३. कारल्यानं हृदय मजबूत होते, आणि कोणतेही हृदयरोग होत नाहीत. कारलं हे कावीळ आणि हेपिटायटीस यांसारख्या गंभीर आजांरापासून आपल्याला लांब ठेवते.

४. कारल्याचा रस प्यायल्याने डोळे निरोगी राहतात. कारल्याने डोळ्यांचे आजार होत नाही.

कारलं शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवतं. सकाळी उपाशी पोटी कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेहासारखे आजार टाळता येतात.

- Advertisement -