ताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या ‘4’ प्रकारे परिणाम

- Advertisement -

ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते.

अनेकदा केसगळतीचा त्रास हा शाम्पू बदलल्याने, प्रदूषणामुळे होतोय असं समजून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता परंतू तुमच्यावरील तणावामुळेही केसांचे आरोग्य बिघडू शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
जाणून घ्या ताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

केस विरळ होणं  

- Advertisement -

पोषक आहाराचा अभाव असल्यास शरीर सर्व्हायव्हल मोडवर जाते. त्यामुळे शरीरातील साचून राहिलेली उर्जा केसांच्या वाढीसाठी वापरली जात नाही. हा त्रास फार काळ राहिल्यास केसांवर त्याचा परिणाम होतो.

चमक कमी होणं  

तुमच्यावर खूप ताणतणाव असल्यास त्याचा परिणाम केसांवर दिसून येतो. केसांची चमक कमी होते.  ताणतणावामुळे चमक कमी होते. परिणामी केस फ्रिजी होतात.

केस अकाली पांढरे होणे 

ताण आणि केस पांढरे होणं हे थेट एकमेकांवर अवलंबून नसले तरीही काही जेनिटिक समस्या  असणार्‍यांमध्ये हा ताण तणाव हा धोका वाढवू शकतो. केस अकाली पांढरे होण्याची शकयता वाढते.

केसगळती 

ताणतणावामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन निर्माण त्याच्या परिणाम केसांवर होतो. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे केस शुष्क होणं, विरळ होणं हा त्रासही वाढतो.

- Advertisement -