रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित ठेवते हे ‘तेल’

- Advertisement -

प्रत्येकाला आपल्या तब्येतीची काळजी असतेच. जो तो आपल्याला चांगले आरोग्य लाभावे आणि आजारमुक्त करावे यासाठी झटत असतो. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी व ग्लुकोजचे मेटॅबॉलिझम सुरळीत करण्यासाठी कॅमेलिना ऑईल उपयोगी असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ इस्टर्न फिनलँडतर्फे करण्यात आलेले हे संशोधन मॉलिक्युलर न्यूट्रीशन अँड फूड रिसर्च या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले.

या संशोधनात कॅमेलिना ऑईल, फॅटी फिश व लीन फिश आणि ग्लुकोजचे मेटॅबॉलिझम यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यात आला. कॅमेलिना ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात लिनोलेनिक अॅसिड आढळते. यामध्ये असलेले ओमेगा-३ हे बहुगुणी तत्व हृदयासंबंधित विकारांवर उपयोगी आहे.
चार गटांमध्ये ७९ स्त्रिया व पुरुषांवर करण्यात आलेल्या या संशोधनात कॅमेलिना ऑईलचे कोलेस्टेरॉल पातळीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे आढळून आले.

- Advertisement -