Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यशरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ आवश्यक!

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ आवश्यक!

निसर्गातील जो-जो घटक लाल रंगाचा किंवा लालसर, काळसर वा तपकिरी रंगाचा असेल तो रक्तवर्धक होईल, असा अनुमान प्रमाणावर आधारित निष्कर्ष प्राचीन काळामध्ये पुर्वजांनी काढला.  या निष्कर्षानुसार लालसर-काळ्या पानांची माठाची भाजी, काळसर रंगाची पिकलेली करवंदे, काळ्या मनुका, लालसर अहळीव (हलीम), काळ्या रंगाचे कारळे, काळे तीळ, काळसर तपकिरी रंगाचे खजूर, लालसर तपकिरी रंगाची तांदळाची तुसे, तांबूस रंगाचे आमचूर चूर्ण,  लाल चणे, पांढर्‍या-काळ्या रंगाची चवळी, लालसर काळ्या रंगाची अळूची पाने, तांबूस रंगाचा कमळकंद, तपकिरी रंगाचा अळूचा कंद, तपकिरी काळसर रंगाचे केळफूल, गडद काळ्या रंगाची पिंपळी वगैरे पदार्थ रक्तवर्धक आहेत.  करवंदांपासून लालमाठापर्यंत आणि अहळीवापासून आमचूरापर्यंत सर्वच लाल-काळ्या रंगाचे पदार्थ हे रक्तवर्धक असतात, कारण त्यांच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. या पदार्थांमध्ये नेमके किती प्रमाणात लोह मिळते, हे जाणून घ्यायला वाचकांना खचितच आवडेल. (पुढे १०० ग्रॅम पदार्थामधील लोहाचे प्रमाण मिलिग्रॅममध्ये दिले आहे. लोहाची दिवसाची गरज : सरासरी ३० मिलिग्रॅम)तांदळाची तुसे: ३५, चण्याची पाने: २३.८, लाल चणे( भाजलेले): ९.५, अळूची पाने : १०, चवळीची पाने : २०, माठाची पाने : ३८.५, बीट : १.१९, गाजर : १.०३, करवंदे(सुकी) : ३९, खजूर(सुके) : ७.३, कमळाचे देठ : ६०.६, अहळीव-दाणे, : १००,कारळे-बिया : ५६.७, आमचूर पावडर : ४५.२, पिंपळी : ६२, वरील बहुतेक पदार्थ हे लालसर-तांबुस किंवा काळसर रंगाचे आहेत.

गाजर-बीटचा रक्तवर्धनासाठी उत्तम म्हणून फार प्रचार केला जातो, त्या तुलनेत अस्सल भारतीय खाद्यपदार्थ कितीतरी अधिक प्रमाणात शरीराला लोह पुरवतात. बीटमधून अल्प प्रमाणात लोह मिळते, असे नाही. जी फळे व भाज्या अस्सल देशी आहेत, याच मातीतील आहेत, ती आपल्या शरीरासाठी अधिक सात्म्य असणार, नाही का? तेव्हा रक्त वाढवण्यासाठी  या काळ्या-लालसर वर्णाच्या आहाराचे सेवन करा. रक्त वा हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी ज्या गोळ्या-कॅप्स्युल्स वगैरेचे तुम्ही सेवन करता ते अनेकांना मलावरोधास व मळमळ होण्यास कारणीभूत होते,  तसे या नैसर्गिक पदार्थांबाबत होत नाही. जो खाद्यपदार्थ रक्त वा कृष्णवर्णीय असतो,  तो-तो रक्तवर्धक असतो; हा आपल्या प्राचीन पुर्वजांचा निरिक्षणावर आधारित अनुमानजन्य निष्कर्ष वास्तवातही सत्त्य आहे, असेच दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments