Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यडार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास हे जाणून घ्या!

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास हे जाणून घ्या!

सौंदर्याच्या बाबतीत आजकाल मुली खूप जागरूक झाल्या आहेत. धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे पुरेसे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. काही वेळेस झोप पूर्ण न झाल्यास डोळे सुजलेले आणि थकलेले दिसतात. पण, एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे मेकअपचा पर्याय असल्याने सुजलेल्या, थकलेल्या डोळ्यांनी बाहेर पडावे लागणार नाही.  मेकअप ही अशी जादूची कांडी आहे की ती फिरवल्याने तुमचा पूर्ण लूकच बदलतो. पण त्यासाठी मेकअप करताना तो योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे काही मिनिटातच तुम्ही फ्रेश, सतेज दिसता. 

आयशॅडो फिकट रंगाचे वापरा: फिकट रंगाचे आयशॅडो डोळ्यांच्या आतल्या कॉर्नरला लावल्याने डोळे मोठे व फ्रेश दिसू लागतात. म्हणून जर निद्रानाशाचा त्रास असेल तर डोळे थकलेले न दिसता फ्रेश दिसण्यासाठी फिकट रंगाचे आयशॅडो वापरा.

कन्सीलरवर हायलायटर लावा: कन्सीलर लावल्याने डार्क सर्कल्स झाकले जाणार नाहीत. म्ह्णून त्यासाठी कन्सीलरवर शिमरी हायलायटर लावा.

पापण्या कर्ल करा: मस्कारा लावण्यापूर्वी पापण्या कर्ल केल्यास पापण्या दाट व लांब दिसतात. त्यामुळे डोळे सुंदर व मोठे दिसतात. कर्ल करताना विशेष काळजी घ्या आणि पापण्या पूर्ण म्हणजे रूटपासून टिपपर्यंत कर्ल होतील, असे पहा.

आयब्रोज ठळक करा: आयब्रोज आर्च केल्याने सुजलेल्या डोळ्यांकडे फारसे लक्ष जाणार नाही. ठळक आयब्रोज लक्ष वेधून घेतील. आयब्रोज ठळक करण्यासाठी आयब्रो पेन्सिल किंवा आयशॅडो वापरा. आयशॅडोने आयब्रोला फेदरी स्ट्रोक्स द्या. मग नॅचरल लुक येण्यासाठी आयब्रोजवर ब्रश फिरवा.

आयशॅडोचा आवडीचा शेड लावा: नॅचरल लुक ठेवण्यासाठी आयशॅडोचा तुमच्या आवडीचा शेड घेऊन लावा. डोळ्यांच्या बाहेरच्या कॉर्नरला लावा. या ट्रिकमुळे डोळे उठून दिसतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments