Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यडार्क सर्कल्स हटवण्यासाठी थंड दुधाचा वापर!

डार्क सर्कल्स हटवण्यासाठी थंड दुधाचा वापर!

रात्री उशिराभर जागल्याने, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची समस्या अनेकांना भेडासवते. मग त्यांना लपवण्यासाठी आता सौंदर्यप्रसाधनांची काहीच गरज नाही. कारण थंडगार दूध या समस्येपासून तुमची झटपट सुटका करू शकते. हे तुम्हाला ठाऊक  आहे का?

थंड दुधाचे फायदे….

थंडगार दुधामुळे डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळं, सूज यांचप्रमाणे सुरकुत्यादेखील कमी होण्यास मदत होते. दुधाचा थंडावा रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करतो . तसेच दुधातील प्रोटीन्स डोळ्यांच्याखालील त्वचेचे पोषण करते व लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचा मऊसूद होते.

कसा कराल थंड दुधाचा वापर….

थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो काही वेळ  डोळ्यांवर ठेवावा. ५-१०  मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.
याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी,  थंड दुधाचा डोळ्यांवर हलका मसाज केल्याने सकाळी तुमचा चेहरा टवटवीत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments