Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeआरोग्यपुरुषांच्या परफ्युमने स्त्रिया होतात मद्यधुंद

पुरुषांच्या परफ्युमने स्त्रिया होतात मद्यधुंद

पुरुषांनी लावलेल्या परफ्युमच्या सुगंधाने उत्तेजित होऊन स्त्रिया नेहमीपेक्षा जास्त मद्यपान करतात. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा येथील मानसशास्त्र विभागातील वैज्ञानिकांनी २१ ते ३१ वयोगटातील १०३ स्त्रियांचा अभ्यास केला. यामध्ये हे समोर आले.

स्त्रियांना असे सांगण्यात आले, की पुरुषांच्या परफ्युम व मद्यपानाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांना या सर्व्हेत सहभागी करण्यात आले आहे. अँड्रोस्टिनोन नामक फेरेमोन हा रानडुक्कराच्या लाळेतील पदार्थ असलेल्या परफ्युम पट्ट्या स्त्रियांना वास घेण्यासाठी देण्यात आल्या. दहा मिनिटांच्या अवधीनंतर स्त्रियांना मद्यसेवन करण्यास सांगितल्यावर ज्यांनी फेरेमोनचा वास घेतला होता, त्यांनी कंट्रोल ग्रुपच्या तुलनेत दहा टक्के जास्त मद्यप्राशन केल्याचे आढळले.
संशोधकांनी असा निष्कर्ष काढला, की सुगंधामुळे मद्यपान वाढते कारण मद्यपान व शारीरिक आकर्षण यांचा सांस्कृतिक संबंध आहे. शेवटी संशोधकांनी सांगितले, “पुरुषांच्या परफ्युमच्या सुगंधाकडे आकर्षित होऊन स्त्रियांमधील कामोत्तेजना वाढते. पाश्चिमात्य देशांमध्ये शारीरिक जवळीक व मद्यपान यांचा परस्पर संबंध असल्यामुळे स्त्रिया पुरुषांच्या परफ्युमच्या सुगंधाने उत्तेजित होतात व अधिक मद्यपान करतात.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments