Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यनारळाचे तेल आणि लिंबूच्या रसाचे मिश्रणाचे ५ फायदे

नारळाचे तेल आणि लिंबूच्या रसाचे मिश्रणाचे ५ फायदे

मुंबई : चेहरा तसेच केसांशी संबंधित समस्यांवर अनेकदा आपल्या घरातील उपाय कामी येतात. नारळाचे तेल आणि लिंबाच्या मिश्रणाचे अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे फायदे 

डागांवर गुणकारी – दोन मोठे चमचे नारळाच्या तेलात दोन लहान चमचे लिंबू रस मिसळा. या मिश्रणाने दोन मिनिटे मसाज कराआणि पाच मिनिटानंतर चेहरा धुवा.

मोठ्या छिद्रांसाठी – आठवड्यातून तीन वेळा चेहरा धुतल्यानंतर एक चमचा नारळाच्या तेलात दोन लहान चमचे लिंबूचा रस मिसळा. कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

लांब केसांसाठी – आठवड्यातून दोन ते तीन वेळा दोन चमचे नारळाच्या तेलात एक चमचा लिंबूचा रस मिसळून स्काल्पवर लावा.

उजळ त्वचेसाठी – दोन लहान चमचे नारळाच्या तेलात एक लहान चमचा लिंबूचा रस मिसळा. कापसाच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा.

केसातील कोंड्यासाठी – आठवड्यातून दोन वेळा आंघोळ कऱण्याच्या १५ मिनिटेआधी दोन छोटे चमचे नारळाच्या तेलात दोन मोठे चमचे लिंबाचा रस मिसळून स्काल्पला मसाज करा आणि नंतर केस धुवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments