Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यजेवणानंतर या गोष्टी टाळा!

जेवणानंतर या गोष्टी टाळा!

सर्वसाधारणपणे जेवण झाल्यानंतर अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय असते किंवा लगेच झोपण्याची सवय असते. पण तुमच्या आरोग्यासाठी नेमक्या याच गोष्टी हानीकारक आहेत. कारण या गोष्टी केल्याने त्याचा थेट तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने तुमची फक्त पचन क्रियाच बाधीत होत नाहीतर यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो.

जेवणानंतर तुम्ही लगेच अंथरुणावर पडलात किंवा लगेच झोपी गेलात तर तुमची पचनक्रिया थांबते. अन्न पचायला थोडा वेळ लागतो. जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता असते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर शतपावली केल्यास त्याचा अन्न पचनासाठी नक्कीच फायदा होतो.

जेवणानंतर अनेकांना फलाहार करण्याची सवय असते. पण ते सुद्धा पचनासाठी फारसं फायदेशीर नाही. जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळे नेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवी. त्यातही सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणे सर्वाधिक फायदेशीर असते.

जेवणानंतर लगेच अंघोळ करणं देखील आरोग्यास हानीकारक असतं. अंघोळ करताना हात – पाय सक्रिय असतात. यामुळे या भागातील रक्तप्रवाह वाढतो. पोटातलाही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.

जेवणानंतर अनेकांना घटाघटा पाणी पिण्याची सवय असते. तेही शक्यतो टाळावं, जेवणानंतर साधारण १५-२० मिनिटांनी पाणी प्यायलेलं कधीही चांगलं असतं. कारण जेवताना किंवा लगेच जेवणानंतर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया प्रभावित होते

जेवणानंतर काही लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण तसं करणं देखील तुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे प्रथिनांच्या पचनावर वाईट परिणाम होऊन प्रथिनांची पचनक्रिया प्रभावित होते. म्हणून जेवणानंतर चहा हवाच असेल तर तो किमान दोन तासांनी प्यायला हवा. जेणेकरून तुमच्या पचनक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments