Friday, March 29, 2024
Homeआरोग्यहिवाळ्यामध्ये कोमट पाण्याने अंघोळ करा, गरमपाणी हानीकारक

हिवाळ्यामध्ये कोमट पाण्याने अंघोळ करा, गरमपाणी हानीकारक

Warm water bath winter,Warm, water,bath, winter
Representational Image

हिवाळ्यात थंडीत कुणाला मौजमजा करण्यास आवडते तर कुणाला थंडी सहन होत नसल्यामुळे आजारांनाही सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते. गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय त्वचा आणि केस दोन्हीसाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जाणून घेऊया गरम पाणी आणि इतर सवयींमुळे होणारे नुकसान.

१. अनेकजण अंघोळ करताना फक्त हातांना, बगलेत आणि चेहऱ्याला साबण लावतात, परंतु संपूर्ण शरीरावर चांगल्या प्रकारे साबण लावला पाहिजे.
२. गरम पाण्याने दहा मिनिटांपेक्षा जास्त अंघोळ करू नये. अन्यथा त्वचेवरील मॉइश्चर नष्ट होईल.
३. गरम पाण्याने स्नायू सैल होतात, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण यामुळे त्वचा रुक्ष होते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा.
४. सतत गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कधी-कधी कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेमध्ये मॉइश्चर टिकून राहील. अन्यथा त्वचा ड्राय होईल.
५. गरम पाण्याने अंघोळ केल्याने इंटर्नल हीट लॉस होते. यासोबतच थंड वातावरणात शरीर सहन करत नाही. अशा वेळी सर्दी-खोकला होऊ शकतो.
६. सुगंधित साबणाने अंघोळ केल्याने त्वचा रुक्ष होऊ शकते. यामुळे इचिंग होते आणि त्वचेचा वरचा भाग कोरडा पडण्यास सुरुवात होते.
७. अंघोळीनंतर त्वचेचा मॉइश्चर सुकण्याअगोदरच शरीराला तीन मिनिटे चांगल्या प्रकारे मॉइश्चर करा. कारण त्वचा कोरडी झाली तर त्यामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात.
८. दररोज केसांना शाम्पू करू नका. पातळ आणि कमजोर केसांना आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळ शाम्पू करू नये. अन्यथा केसांच्या मुळांचे नॅचरल ऑइल नष्ट होईल.
९. कृत्रिम रंग किंवा सुगंधित साबणाचा वापर करू नका. कारण यामुळे त्वचेचे मॉइश्चर नष्ट होते. अॅसिडिक सोप वापरू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments