Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यगरम चहा पिण्याची सवय आहे तर बदला

गरम चहा पिण्याची सवय आहे तर बदला

Change if you have a habit of drinking hot tea
काही लोकांना जास्त गरम चहा पिण्याची सवय असते. तर ही सवय बदलून घ्या. पोटासंबंधी कित्येक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. गरम चहा घेतल्यामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे.

जास्त गरम चहा पिऊ नका : ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित स्टडीनुसार जास्त गरम चहा पिल्याने तोंडाद्वारे पोटाला जोडणाऱ्या नळयांवर त्याचा प्रभाव पडतो.जे लोक खूप गरम चहा पितात, त्यांना अन्ननलिकेशी संबंधित समस्या होतात. यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शंका वाढते. तज्ञांचे म्हणणे आहे की जास्त गरम चहा पिल्याने रक्तवाहिकांचे नुकसान होते.

चहामुळे शरीरावर परिणाम : ब्रिटिश संशोधकांनी याबाबत संशोधन केले. त्यांना असे आढळून आले की, गरमीच्या एका दिवसात शीतपेय प्यायल्यावर ०.५ डिग्री शरीराचे तापमान कमी होते. फक्त ९ मिनिटांच्या आत आइस टी प्यायल्यास तापमान ०.८ डिग्रीपर्यंत कमी होऊन जाते. जर गरम चहा प्यायल्यास शरीराचे तापमान १-२ डिग्रीपर्यंत कमी होऊन जाते. म्हणजे गरम चहामुळे शरीर पटकन थंड होते.

होणारे नुकसान : चहामध्ये टॅनीन, टायलिन असते. याला जास्त पिल्याने अपचन होऊ शकते. पोटासंबंधी समस्या वाढतात, चहामध्ये फ्लोराइड असते, याने हाडे कमकुवत होतात. यामुळे सारखी सारखी यूरिनची समस्या होते. यात सोडियम,पोटॅशियम सारखे खनिजे शरीरातून बाहेर फेकले जातात व अशक्तपणा वाढतो. चहामध्ये कॅफीन असते, सारखा सारखा चहा पिल्याने चक्कर, डोकेदुखी, थकावट जाणवते त्यामुळे चहा पिण्याआधी दहा वेळ विचार करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments