Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यगूळ - गरम पाण्याचे सेवन केल्याने ४ गंभीर आजार होतील दूर

गूळ – गरम पाण्याचे सेवन केल्याने ४ गंभीर आजार होतील दूर

hot water with jaggeryझोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम अशा या गुळामध्ये बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे. आपल्या शरीरास तो खूप लाभदायी आहे. आयुर्वेदानुसार दररोज उपाशीपोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्याने गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या आजारांपासून मुक्तता होते. सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.

१. गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होते, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो. यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो. ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जुन हे करावे. गॅसचा त्रास असणाऱ्यांनी रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर गूळ खावा.

२. तुम्हाला संपूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर सकाळी उपाशीपोटी गूळ नक्की खावा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शरीरातील शुगरही नियंत्रणात राहते.

३. खानपानाच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. अशा वेळी दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

४. ज्यांना अन्न पचन सहज होत नाही त्यांच्यासाठी गूळ आणि गरम पाणी हा रामबाण उपाय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments