Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यया पदार्थांचे सेवन करून वाढवा वजन

या पदार्थांचे सेवन करून वाढवा वजन

Weight Gain Diet Food,Weight Gain,Weight,Body Gain,Diet Food,Dietवजन वाढवण्यासाठी हिवाळा सर्वात चांगला मौसम मानला जातो. हिवाळ्यात पौष्टिक आहार घेतल्याने वजन लवकर वाढते. वजन वाढवणाऱ्या ५ पौष्टिक पदार्थांविषयी जाणून घेऊन या.

डाळींब : यामधील अँटिऑक्सिडंट्समुळे भूक वाढते. दिवसातून एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस पिल्याने वजन लवकर वाढते.

दही : यामधील चांगल्या बॅक्टेरियामुळे जास्त भूक लागते. साय असेलेले दही खा. यामुळे वजन वाढते.

काजू : यामध्ये हाय कॅलरी आणि चांगले फॅट्स असतात. काजू तुपामध्ये फ्राय करून खावे. यामुळे वजन वाढते.

केळी : यामध्ये शुगर आणि कॅलरी जास्त असतात. यामुळे वजन वाढते. दुधासोबत केळी खाल्ल्याने फायदा होतो.

संत्र्याचा ज्यूस : यामध्ये हाय कॅलरी आणि साखर असते. यामुळे वजन वाढते. रोज एक ग्लास संत्र्याचा ज्यूस पिल्याने फायदा होतो.

वजन कमी होण्याची कारणे…

औषधी घेतल्याने : अनेक प्रकारचे औषध घेतल्याने पचनक्रिया खराब होते. यामुळे भूक कमी लागते. जेवणात मन लागत नाही.

तणाव असल्याने : तणावामध्ये राहिल्याने हार्मोनच्या स्तराचे संतुलन राहत नाही. यामुळे भूक लागत नाही.

मासिक पाळी आल्यावर : मासिक पाळीच्या काळात शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात. या काळामध्ये भूक कमी लागते आणि वजनही कमी होते.

पोट खराब झाल्यामुळे : पोटाची समस्या दीर्घकाळ राहत असेल तर भूक कमी लागते. यामुळे वजनही कमी होते.

हे सुध्दा करा…

पवनमुक्तासनसारखी योगासने करा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जास्त भूक लागते.

सुका मेेव्याचे सेवन केल्यानंतर दूध प्यावे. यामुळेही लवकर वजन वाढते.
आहारामध्ये चीज आणि बटरसारख्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे वजन वाढते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments