Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यनॉर्मल डिलिव्हरीसाठी हे करा!

नॉर्मल डिलिव्हरीसाठी हे करा!

सिझेरीयन केल्याने लेबर पेन तर कमी होतं पण त्यामुळे आईच्या हृदयाला अस्वस्थता जाणवते, जे तिच्या शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणून आपली वडीलधारी माणसं नॉर्मल डिलिव्हरीवर भर देतात. पण काही असे उपायही आहेत ज्याने नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.

बाळाला जन्म देताना आईला खूप त्रास सहन करावा लागतो आणि ते फार कठीणही असतं. त्यात जर तुम्ही कमजोर असाल आणि तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

– गर्भधारणे दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच भोजन करा आणि तुमचा आहार त्यानुसारच ठेवा. नॉर्मल डिलिव्हरीदरम्यान शरीरातून २ ते ३ किंवा ४००एमएल इतका रक्तस्राव मातेच्या शरीरातून होत असतो. त्यामुळे ताकद आणि पोषणासाठी अधिकाधिक पौष्टिक अन्न खा.

– गर्भधारणेमध्ये लोह आणि कॅल्शिअमची खूप शरीरात खूप गरज असते, म्हणून आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त या पदार्थांना समाविष्ट करा.

– मातेच्या गर्भाशयात बाळ हे एका अम्निओटिक द्रव पदार्थात असतं. ज्याने बाळाला उर्जा मिळते. त्यामुळे दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. त्याने बाळाला पाण्याची कमतरता जाणवणार नाही.

– गर्भावती अवस्थेत महिलांना आराम खूप महत्त्वाचा आहे.  पण त्याचा अर्थ असा नाही की आपली सगळी कामं सोडून फक्त आराम करावा. आपली रोजची महत्त्वाची काम करून तुम्ही आराम करा.

– या अवस्थेत चालण्याचा व्यायाम उपयोगी असतो. जास्तीत जास्त फेरफटका मारा

– जर तुम्ही गर्भवती होण्याआधीपासूनच व्यायाम करत असाल तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचं प्रमाण जास्त आहे.  गर्भधारणेदरम्यान तुम्ही एखाद्या फिटनेस सेंटरला जाऊ शकता. याने तुमच्या स्नायूंना मजबुती येईल. बाळाला जन्म देताना तुमच्या स्नायूंची मजबुती खूप महत्त्वाची आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments