भूक लागल्यावर तुमचा देखील मूड बदलतो का?

- Advertisement -

भूक लागल्यावर तुमचा देखील मूड बदलतो का? आणि चिडचिड होते का? जर असंच होत असेल तर यामध्ये तुमचा काही दोष नाही. कारण राग येणं, व्याकूळ होणं आणि थरथरी भरणं ही भूक लागल्याची अगदी सामान्य लक्षणं आहेत. चैन्नई, कोची आणि नवी दिल्लीमध्ये भूक लागल्याची लक्षणं आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया याचे मूल्यांकन करण्यात आले. आणि या सर्वेक्षणातून एक धक्कादायक माहिती समोर आली. 

स्निकर्स मार्स रिंगली कन्फेक्शनरीद्वारे तीन तीन लोकांचे समूह करून चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे काही प्रॅक्टिकल टेस्ट देखील करण्यात आल्या. हा सर्व्हे तब्बल आठवडाभर चालला. आणि यातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीने सांगितले की, यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये भरपूर प्रमाणात परिवर्तन झाला. भूक लागल्यानंतर या व्यक्तींमध्ये मोठा बदल झाला. त्यांचे वागणे अतिशय बदलले. आणि रागाचे प्रमाण अधिक वाढले. जेव्हा भूक अनावर होते तेव्हा लोकांना एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याची सूचना मेंदूकडून मिळत असते. ज्यामुळे ती व्यक्ती अधिकच उदासिन आणि एका वेगळ्याच ट्रान्समध्ये जाते.

- Advertisement -
- Advertisement -