Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यजेवण टाळल्याने ‘असे’ दुष्परिणाम दिसतात?

जेवण टाळल्याने ‘असे’ दुष्परिणाम दिसतात?

Dont skipकामाचा ताण, वेळेचा अभाव किंवा कामानिमित्त सतत बाहेर फिरतांना बरीच मंडळी जेवणाकडे दुर्लक्ष करते. परंतु हाच दुर्लक्षपणा किती घातक आहे. ज्यावेळी त्याचे परिणाम दिसून येते त्यावेळी बराच वेळ निघून जातो. त्यामुळे जेवणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

पोषक घटकांची कमतरता

शरीरातून पोषक घटक कमी होऊन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांसारख्या पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. काहीही न खाता बाहेर पडल्याने शरीराला आवश्यकतेनुसार पौष्टिक घटक मिळत नाहीत.

अनियमित रक्तदाब वाढतो

जेवण टाळण्याचा परिणाम हा शरीरताल शर्करेवर होतो. याचा परिणाम शरीरातील होर्मोन्सच्या प्रवाहावर होतो आणि शरीरात कमी झालेली शर्करा भरून येत नाही. यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब

जेवण उशीरा केल्याने इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब होतो. यामुळे मधुमेह वाढण्याचा धोका बळावतो. दुपार किंवा रात्रीचे जेवण न केल्याने रक्तामधील शर्करेची पातळी वाढते.

रक्तातील शर्करा वाढत जाते

जेवण न केल्याने रक्तातील शर्करेची पातळी कमी होते. यामुळे अशक्तपणा येतो शिवाय शरीराच्या सर्व अवयवंवर याचा परिणाम होतो. आहारातून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचे विभाजन होऊन त्याटचे रूपांतर शरीरात होते.

अपचानाचा त्रास वाढतो

बराच काळ जर पोट रिकामे राहिले तर गॅस्ट्रिक अॅसिडचे प्रमाण वाढते. या अॅसिडची निर्मितीमुळे अपचन तसेच पित्त अशा समस्या उद्भवतात. जेवण टाळल्याने अपचन, पोट साफ न राहणे, ढेकर येणे अशा अनेक समस्या उद्भवतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments