Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यज्यूस प्या आणि आजार पळवा

ज्यूस प्या आणि आजार पळवा

फळांचे आणि भाज्यांचे ज्यूस आपण नेहमीच पित असतो, पण कोणत्या आजारांवर कोणता ज्यूस जास्त फायदेशीर आहे याबद्दल आपल्याला फारसं माहीत नसतं. अनेकदा घरातच ही औषधं असतात. अशाच काही आजारांवर कुठले ज्यूस आहेत ते पाहू.

1) खोकला

काही लोकांना सतत खोकल्याचा त्रास सतावत असतो. त्याला बरं करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस पिळा आणि तो ज्यूस प्या. एका ग्लासात गाजराचा ज्यूस घ्या त्यात तुळस आणि लसणाचा थोडा रस टाका आणि तो ज्यूस प्या. या दोन्ही पद्धतीने तुमचा खोकला लवकर बरा होईल.

2) मायग्रेन

जर तुम्ही मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त असाल तर एक ग्लास पाण्यामध्ये लिंबू आणि आल्याचा रस पिळून तो ज्यूस प्या.

3) फ्रॅक्चर

जर तुमच्या शरीरातील कोणताही भाग फ्रॅक्चर झाला असेल तर पालक, मेथी, पुदिना आणि धणे यांची पेस्ट करून ती पाण्यात मिसळा आणि प्या. यावर आणखी एक उपाय आहे ते म्हणजे पेरु आणि पपईचा ज्यूस पिणे हे अधिक फायद्याचं आहे.

4) अॅसिडिटी

जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर कोबी आणि गाजर यांचा ज्यूस प्या. अॅसिडिटी घालवण्यासाठी मोसंबी आणि टरबुजाचा ज्यूसही खूप फायद्याचा आहे.

5) झोप न लागणे

झोप लागत नाही अशा अनेकांच्या समस्या असतात. त्यावर उपाय म्हणून पालक, सफरचंद आणि पेरूचा ज्यूस प्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments