Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यमुंबईत जनजागृतीमुळे एचआयव्ही रुग्णांमध्ये झाली घट

मुंबईत जनजागृतीमुळे एचआयव्ही रुग्णांमध्ये झाली घट

HIV AIDS,World AIDS Day,AIDS,HIV
Image: Jagran

मुंबई: दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. एचआयव्हीबद्दल पूर्वी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये भीती होती. लाज, संकोच आणि सामाजिक बहिष्कृतीच्या भीतीने निदान चाचण्यांसाठीही पुढाकार घेतला जात नव्हता. मात्र, या आजाराबद्दल सातत्याने केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्हीचा संसर्ग कमी झाला आहे. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांमध्ये रुग्णांमध्ये ४२.२ टक्क्यांनी घट झाली आहे.

दोन दशकांमध्ये सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्हीसाठी केले जाणारे स्क्रीनिंगचे ६६ टक्क्यांनी वाढले आहे. २०१४-१५मध्ये हे प्रमाण २.८ लाख इतके होते, तेच २०१८-१९मध्ये ४.७ लाख इतके झाले. २०१४-१५मध्ये हे प्रमाण ८५९३ इतके होते तर २०१८-१९मध्ये ते ४९५६ इतके झाले. गर्भवती महिलांमध्ये होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण हे २०१४-१५ मध्ये २५५ इतके होते ते २०१८-१९ मध्ये १५५ इतके घटले आहे.

यापूर्वी एचआयव्हीसाठी कराव्या लागणाऱ्या रक्तचाचण्यांसाठी पुढाकार घेतला जात नव्हता. मागील पाच वर्षांत एचआयव्हीसाठी होणारे स्क्रीनिंग ६६ टक्क्यांनी वाढले असून सामान्यांमध्ये या विषयासंदर्भात सातत्याने केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे हा फरक पडल्याचे दिसून येत आहे. एचआयव्ही संसर्ग म्हणजे आयुष्य संपले ही भीती आता सामान्यांच्या मनामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे खात्री करण्यासाठी तसेच काळजी घेण्यासाठी तपासणी करण्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत एचआयव्ही नियंत्रणामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यदूतांनी व्यक्त केले आहे.

रक्तातून, इंजेक्शनच्या सुईमधून संसर्ग होणे तसेच आईकडून मुलाला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाणामध्येही घट झालेली दिसते. संसर्ग झालेल्या व्यक्तींना झालेल्या कारणांमध्ये ९३.७ टक्के व्यक्तींमध्ये असुरक्षित लैंगिक संबधामुळे संसर्ग झाला आहे, तर आईकडून मुलांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण ०.१ टक्के इतके आहे. रक्तातून आणि इंजेक्शनच्या सुईमधून संसर्ग होण्याचे प्रमाणही ०.१ टक्के आहे.

जिंदगी नावाचे नवीन अॅप…

मोबाइलमधील तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या वाढता वापर लक्षात घेता जिंदगी नावाचे नवीन अॅप मुंबई महानगरपालिका आणि मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ज्यांना एआरटी केंद्रामध्ये येऊन वैद्यकीय उपचार घेणे शक्य नाही त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तरे दिली जाणार आहे. त्यासाठी या अॅपरवर नोंदणी करणे बंधनकारक असून समुपदेशकाला रुग्णांच्या मनातील एचआयव्हीच्या संदर्भातील गैरसमजुती दूर करण्यसाठी मदत करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments