पहाटेची वेळ ‘प्रणया’साठी आरोग्यासाठी उत्तम!

- Advertisement -

पहाटे उठून व्यायाम करणे, धावणे किंवा योगा करण्यास सांगितले जाते. मात्र अमेरिकेतील एका संशोधनानुसार सकाळी सेक्स केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते, असे नेहमी डॉक्टरही सांगत असतात. मात्र संशोधनानुसारही ते उत्तम असल्याची माहिती समोर आल्याने त्याच्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.

पहाटेच्या वातावरणात ऑक्सीजनचे प्रमाणे सर्वात जास्त असते. त्यामुळे शरीरात जाणाऱ्या जास्तीच्या ऑक्सीजनमुळे तुम्ही अधिक ताजेतवाने होता. शिवाय सकाळच्या वेळेस सेक्स केल्याने शरीरातून बाहेर येणाऱ्या स्त्रावांमुळे मूड अतिशय चांगला राहतो. ज्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहता.दिवस आणि रात्रीच्या तुलनेत पहाटे तापमान कमी असते, अशावेळी ऐकमेकांचा स्पर्श हवाहवासा वाटतो. थंडीमुळे तुम्ही ऐकमेकांच्या अधिक जवळ येता. ज्यामुळे नाते दृढ होण्यास मदत होते. रात्रभर पूर्ण आराम मिळाल्यामुळे सकाळी तुमचे मन जास्त केंद्रीत होते. ज्यामुळे तुम्हाला प्रणयाचा भरपूर आनंद घेता येतो. सकाळी प्रत्येकालाच फार घाई असते. अशावेळी सेक्स केल्यास शारीरिक हालचाली फारच वेगाने होतात. याचा फायदा तुम्हांला दिवसभर मिळतो. तुम्हांला कोणत्याही वेगळ्या प्रकारचे व्यायाम करावे लागत नाही. तसेच सेक्स अगदी पहाटेच्या वेळी म्हणजे ४ किंवा ५ वाजता केल्यास याचा दुप्पट फायदा मिळू शकतो, असे संशोधनात म्हटले आहे.
प्रणयकरतेवेळी आपली श्वास घेण्याची गती जास्त प्रमाणात वाढते. यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे किडनीचे आरोग्य उत्तम राहते. तसेच सकाळी जास्त प्रमाणात उर्जा खर्च झाल्यामुळे सकाळी छान भूक लागते.पहाटे प्रणय केल्याने दिवसभर तुमच्या मनात सेक्सविषयी विचार येत नाही. ज्याचा फायदा तुम्हाला काम करताना होतो. सेक्स केल्याने तुमचे शरीर आणि मन शांत झाल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

- Advertisement -