Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यफ्लॉवर 'खा' असे होतात फायदे!

फ्लॉवर ‘खा’ असे होतात फायदे!

मुंबई: सर्वत्र स्वयंपाकात वापरली जाणारी एक पौष्टीक भाजी म्हणजे फ्लॉवर. पण ही भाजी खात असताना त्यापासून अनेक फायदे होतात. ते फायदे कोणते आहेत. त्या बाबत आपण जाणून घेऊ या. शरीरास उपयुक्त असे अनेक पोषक घटक फ्लॉवरमध्ये असतात. फ्लॉवरमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रोटीन, कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन्स, आयोडीन, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषकघटक असतात. पोषकघटक असल्याने त्यापासून मिळणारे फायदे देखील अनेक आहेत.

रक्त शुद्ध होते
फ्लॉवर रक्त शुद्ध करते. त्याचबरोबर त्वचेचे आजार होण्यापासून बचाव होतो. रक्त शुद्ध होण्यासाठी कच्चा फ्लॉवर खा किंवा फ्लॉवरच्या ज्युसचे सेवन करा.

सांध्यांचे दुखणे कमी होते
सांधेदुखी असल्यास फ्लॉवर खाणे फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर हाडांचे दुखणे असल्यास फ्लॉवर आणि गाजराचा रस समान प्रमाणात मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने नक्कीच फायदा होईल.

पोटदुखी कमी होण्यास उपयुक्त
पोटदुखी असल्यास त्यावर फ्लॉवरच्या सेवनाने लगेच फायदा मिळेल. फायबर डायजेशन सिस्टम मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये दूर होतात. फ्लॉवरमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे पोटाचे अल्सर आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते
फ्लॉवरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. फ्लॉवरमधील फायबर आणि ओमेगा-3 अॅसिडमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्यासही फ्लॉवर फायदेशीर ठरते, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

प्रेग्नंसीमध्येही लाभदायी
डॉक्टर प्रेग्नंसीमध्ये फ्लॉवर खाण्याचा सल्ला देतात. गर्भाशयातील बाळाच्या विकासासाठी फ्लॉवर लाभदायी ठरते. रिसर्चमधून असे सिद्ध झाले आहे की, सफेद फळे आणि भाज्या स्ट्रोकचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments