Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यकेस गळती रोखण्यासाठी 'हे' करा

केस गळती रोखण्यासाठी ‘हे’ करा

Hairfallतणावामुळे केस विरळ होतात. तुम्ही योग्यवेळी याकडे लक्ष दिले नाही तर टक्कल पडण्याची शक्यता असते. केस गळण्यापासून बचाव करण्याच्या या काही टिप्स आहेत. त्यामुळे काही प्रमाणात तुमची केस गळती थांबण्याची शक्यता आहे.

म्हणून होतात केस विरळ
केसांमध्ये वारंवार कलरिंग किंवा स्ट्रेटनिंग करताना केमिकलचा वापर केल्याने केस विरळ होतात.

केस गरम पाण्याने धुतल्यामुळे त्यामधील ओलावा दूर होतो. यामुळेदेखील केस जास्त गळतात.

केसांमध्ये घाण असल्यामुळे कोंडा होतो. यामुळेदेखील केस विरळ होतात.

हे करून पाहा
आवळा….
यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. रोज एक आवळा खाल्ल्याने केस दाट होतात.

पालक….
यामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि आयर्न असते. यामुळे केस गळती थांबते.

पेरू….
व्हिटॅमिन सी असते. हे जीवनसत्त्व मिळाल्याने केस दाट आणि काळे होतात.

दालचिनी….
सिलेमेल्डिहाइडमुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. यामुळे केसांची वाढ होते.

दही….
प्रथिने, गुड बॅक्टेरिया असतात. यामुळे केस काळे आणि दाट होतात.

ओट्स….
यामध्ये फायबर्स, कॉपर आणि झिंक असते. ते मिळाल्याने केस लांब होतात.

फिश ….
ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असतात. त्याने केस काळे आणि दाट होतात.

हे देखील करु शकता…
केसांमध्ये अंडी लावा. यामुळे केस दाट होतात.

मेंदीमध्ये रिठा, शिकेकाई आणि त्रिफळा मिसळून लावा.

दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्याने कोंडा दूर होतो.

मेथी दाण्यात दही मिसळून लावा. यामुळे केसांची वाढ होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments