Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यसुंदर केसांसाठी, चमकदार त्वचेसाठी करा आवळ्याचे सेवन

सुंदर केसांसाठी, चमकदार त्वचेसाठी करा आवळ्याचे सेवन

आजकाल सुंदर केसांसाठी आणि चमकदार त्वचेसाठी विविध उपचार आणि काळजी घेतली जाते. सुंदर केसांपासून ते चमकदार त्वचेसाठी आवळा हा अगदी फायद्याचा आहे. बाजारातून आवळे घेऊन या आणि त्याचे सेवन करा. आता आवळ्याचे सेवन नेमके कशा प्रकारे करावे याविषयी आम्ही सांगणार आहोत.

आवळ्याचा रस मधासोबत घ्या…

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे त्याचे सेवन फारच महत्त्वाचे आहे. आवळा नुसताच खाणे शक्य नसेल तर आवळ्या रस काढून त्यात थोडा मध घाला आणि तो रस प्या. मधामुळे आवळ्याचा रसाला एक वेगळाच गोडवा येतो. त्यामुळे ज्यांना साखर वर्ज आहे तेदेखील हा रस सेवन करू शकता. आता हा रस कधी प्यावा असा प्रश्न पडला असेल तर दररोज सकाळी उपाशीपोटी हा रस घेण्यास काहीच हरकत नाही.

आवळा कँडी करुन खाऊ शकता…

आवळ्याचा रस प्यायची सवय नसेल किंवा त्याची चव आवडत नसेल तर आवळा कँडीही करून खाऊ शकता. आवळा कँडी इतरबाबतीतही फायदेशीर ठरते. आवळा कँडी तयार कशी करायची हे माहीत नसेल तर एका प्लास्टिकच्या पिशवीत आवळे घेऊन ती पिशवी घट्ट बांधून फ्रिजरमध्ये ठेवा. साधारण आठवडाभर ठेवल्यानंतर आवळ्याला आपोआप कळ्या पडतात.

आता हा आवळा घेऊन त्याला साखरेत बुडवून ठेवू शकता. एका काचेच्या बरणीत हे आवळे भरून त्यात साखर घालून ठेवायची आहे. त्यातील साखर आवळ्याला लागेपर्यंत उन्हात ही बरणी ठेवायची आहे. हा आवळा रोज एक फोड खाल्ला तरी चालू शकेल. याचा फायदा असा की, त्वचा चांगली होतेच शिवाय आवळ्यातील घटक जेवण पचवण्यास मदत करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments