तणाव दूर करा आणि मिळवा चमकदार त्वचा

- Advertisement -

यश मिळवण्याच्या व आपले आयुष्य सुखासीन करण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण लागलेला आहे. विद्यार्थी असो किंवा नोकरदार, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचे आहे. या चक्रामुळे आपण कसे तणावाखाली येतो, हेदेखील लक्षात येत नाही.

भावनिक किंवा शारीरिक बदल हे तणावाचे मुख्य कारण आहे. बुद्धीला योग्य प्रकारे आराम मिळाला नाही तर मेंदू थकतो. यामुळे तणावाची स्थिती निर्माण होते.
तणाव योग्य वेळी निदर्शनास आला तर त्यातून बाहेर निघणे सोपे ठरते. खालील काही उपाय वापरून तुम्ही तणाव दूर करू शकता. यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यासोबतच तुमची त्वचादेखील निरोगी राहण्यास मदत होईल.

१. व्यायाम करणे 

- Advertisement -

व्यायाम तुमच्या आरोग्यासोबतच चेहऱ्यासाठीही उपयोगी आहे. यामुळे तुम्ही तणावापासून दूर राहून चेहरा उजळेल.

२. मित्रांसोबत गप्पा

जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे चिंतित आहात व त्या गोष्टीचा ताण तुमच्यावर आलाय, तर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतील. यासाठी आपल्या मित्रांसोबत बोला. मित्रांसोबत सुखदुःख वाटून घेतल्याने मनावरचा ताण कमी होतो.

३. कुत्र्यांसोबत खेळणे 

पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने तुम्ही तणावापासून दूर राहू शकता. यामुळे तुमचा चेहरा आनंदी दिसेल.

४. लेखन 

लिखाणाच्या माध्यमातून तुम्ही आपला ताण घालवू शकता. यासाठी तुम्हाला दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज नाही. लिखाणाच्या माध्यमातून तणाव घालवल्याने तुमचा चेहरा खुलेल.

- Advertisement -