फणस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

- Advertisement -

फणस आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. jackfruit health benefits फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे.

त्यामुळे फणसपोळी, फणसाचा गर, सरबत या सारख्या विविध पदार्थांमधून गृहिणी आपल्या कुटुंबाला फणस खायला देतात. त्यामुळे फणस खाण्याचे नेमके फायदे कोणते ते पाहुयात.

फणस खाल्याणे हे होणारे फायदे

- Advertisement -

फणसाची पाने स्वच्छ साफ करून सुकवल्यानंतर पानांचे चूर्ण तयार करा. त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात.तोंड आल्यास फणसाची कच्ची पाने चावून थुंकल्याने तोंडाचे विकार कमी होतात.

फणसाच्या सालीपासून निघणारे दूध शरीराच्या सुजलेल्या किंवा दुखापत झलेल्या भागात लावल्यास आराम मिळतो. गुडघ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतात.

 फणसाच्या कोवळ्या पानांना बारीक करून त्यापासून लहान – लहान गोळ्या तयार करा. त्यामुळे गळ्याचे आजार कमी होतात.

पिकलेले फणस खाल्याणे पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे अपचनाच्या समस्या दूर होतात.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित फणसाच्या पानांच्या रसाचे सेवन करणे फायद्याचे असते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे.

- Advertisement -