Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यआरोग्यासाठी ‘पेरु’चे हे आहेत फायदे

आरोग्यासाठी ‘पेरु’चे हे आहेत फायदे

Guava Benifits Peru,Guava, Benifits, Peru,Healthबाजारात मोठ्या प्रमाणात पेरू आले आहेत. पेरू आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहेत, हे माहीत आहे का ? पेरूमध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्याचे फायदे काय? पेरू खाल्याने मधुमेहापासून दूर ठेवते. एकंदरीतच पेरु खाल्याने त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

मधुमेहापासून दूर ठेवतो…

पेरूमध्ये रिच फायबर कंटेंट आणि लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हे मधुमेहापासून दूर ठेवते. शरीरात अचानक वाढणारी साखरेची पातळी वाढण्यापासून थांबवते. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यात मदत…

पेरू मेटाबॉलिज्म वाढवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. अमरुद खाल्ल्यानंतर पोटदेखील भरते आणि कॅलरी कमी हाेते. कच्च्या पेरूमध्ये केळी, सफरचंद, संत्री, अंगुर सारख्या दुसऱ्या फळांच्या तुलनेत जास्त साखर असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते…

पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सामान्य हिवताप किंवा सर्दी खोकला हात नाही.

बद्धकोष्ठ दूर करते…

पेरू दुसऱ्या फळांच्या तुलनेत डायटरी फायबरचा एक चांगला सोर्स आहे. शरीराला १२ टक्के फायबरची गरज असते पेरूमुळे ती पूर्ण होते. त्यामुळे डायजेशन चांगले राहते. याच्या बिया पोट साफ करण्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे आतड्यांची स्वच्छता होते.

दातांचे इन्फेक्शन दूर होते…

पेरूच्या पानांमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल क्वालिटी असते. जी दातांचे इन्फेक्शन दूर करण्यात आणि किड्यांना मारण्यासाठी उपयोगी पडते. पेरूची पाने दातदुखी दूर करण्यासाठी चांगला घरगुती उपाय आहे. पेरूच्या पानांच्या रसाने दात आणि दाढ घासल्याने फायदा होतो.

मेंदूसाठी फायदेशीर…

पेरूमध्ये व्हिटॅमिन बी ३ आणि बी ६ असते, त्यामुळे रक्तभिसरण सुधारते शिवाय स्मरणशक्ती वाढते.

चेहऱ्यासाठीदेखील फायदेशीर…

नियमित सेवनाने सुरकुत्या नाहीशा होतात. शिवाय डोळ्याखालील काळे सर्कल नाहीसे होते.

रंग उजळवते…

पेरूमुळे चेहरा उजळतो आणि ताजेपणा येतो. पिकलेल्या पेरूचा गर चेहऱ्यावर लावल्याने डेड स्कीनला काढता येते आणि रंग उजळताे. व्हिटॅमिनमुळे तजेला येतो.

डोळ्यांचा प्रकाश वाढतो…

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते, ते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. शिवाय डोळ्यात होणारा मोतिबिंदू आणि मस्कुलर डिकंजेशन सारख्या आजारांपासून वाचवते.

कफ बाहेर काढतो…

कच्च्या पेरूचा रस किंवा पेरूच्या पानांचा काढा फुफ्फुसांमधील कफ बाहेर काढतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments