Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeआरोग्यचामखीळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

चामखीळ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

WART  Home Remedies
बहुतेक लोकांना अंगावर चामखीळ येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबाबत चिंतेचे कोणतेही कारण नाही. चामखीळची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करु शकतो. ते उपाय केल्यास जामखीळपासून मुक्ती मिळू शकते.

सफरचंदचं व्हिनेगर :

चामखिळीची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी सफरचंदचं व्हिनेगर अधिक फायदेशीर ठरतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने चिमखिळीवर हे व्हिनेगार लावा. काही दिवसातच चामखिळीचा रंग बदलून ते नष्ट होईल.

बटाट्याचा रस :

बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते.

लसून :

लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या बारीक ठेचून ते चामखिळीवर लावा.

अननसाचा रस :

चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे.

बेकिंग सोडा :

चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखिळीवर देखील फायदेशीर ठरतो. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर ती पेस्ट लावा.

लिंबाचा रस :

लिंबाचा रस चामखिळीवर लावल्याने देखील याची समस्या दूर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments