Friday, March 29, 2024
Homeआरोग्यचेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठीचे घरगुती उपाय!

चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठीचे घरगुती उपाय!

आपण सुंदर दिसावं आणि आपली त्वचा छान असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. पण वाढतं प्रदूषण, जीवनशैलीतील आव्हाने यामुळे तसे होत नाही. मग ब्युटीपार्लरचा रस्ता धरला जातो किंवा बाजारातील महागडी उत्पादने वापरली जातात. मात्र काही घरगुती सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

सुरकुत्या घालविण्यासाठी  मिटवा

एक चमचा मध घ्या. त्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाका. हे मिश्रण रोज चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

स्क्रबिंगसाठी

स्क्रबिंगमुळे चेहऱ्यावरील मृत कोशिका आणि धूळ नाहीशी होऊन रोमछिद्रे मोकळी होतात. घरच्याघरी स्क्रबिंग करण्यासाठी टोमॅटोचा वापर करा. टोमॅटोच्या तुकड्याने हलके मालिश केल्यास त्याचा नक्की चांगला फायदा होतो.

तेलकटपणा घालवण्यासाठी

एक चमचा गुलाबपाणी, वाटलेला पुदिना आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करुन हे मिश्रण एक तास ठेवा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे तसेच ठेवा. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

चेहरा उजळपणासाठी

त्वचेला उजळपणा आणण्यासाठी संत्र्याचा रस, एक चमचा मध आणि गुलाब जल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. चेहरा आण‌ि मानेवर मध लावा. थोडे वाळल्यानंतर बोटांनी चेहऱ्याचा मसाज करा. मध वाळल्यानंतर कोमट पाण्याने ते साफ करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.

काळी वर्तुळे घालवा

 डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी बदामाचे तेल आणि मध एकत्र करा आणि ते काळ्या वर्तुळावर लावा. या मिश्रणाच्या नियमित वापरामुळे काळी वर्तुळं नाहीशी होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments