डोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

- Advertisement -

डोळे हा अवयव सर्वात महत्वाचा आहे, मात्र डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आहे, प्रत्येकजण आपल्या आपण डोळ्याची काळजी तर करत नाही, पण डोळ्यांना अपाय होईल असं काही करतो, तर डोळ्यांना अपाय होवू नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.

डोळ्याची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स

वर्षातून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करा, डोळ्यांवर काही वाईट परिणाम होत असेल, तर समस्या वाढण्याआधी लक्षात येईल.
सूर्यकिरणांपासून डोळ्यांचा रेटिनावर गंभीर परिणाम होवू शकतो, तेव्हा काळा गॉगल प्रखर उन्हात वापरा.
रोज साध्या पाण्याने डोळे धूवा, असं केलं तर तुम्हाला आयुष्यात डोळ्याच्या समस्या येणार नाहीत.
कॉन्टॅक्ट लेन्स वारण्याचं प्रमाण वाढलं आहे, मात्र रात्री झोपताना अनेक लोक कॉन्टॅक्ट लेन्ससह झोपतात. कॉर्नियाला यामुळे इन्फेक्शन होवू शकतं.
लायनर डोळ्यांच्या पापण्यांच्या बाहेरील बाजूस लावा. कारण डोळ्यांच्या अश्रूंसोबत लायनर मिसळलं तर ते धोकायदायक होवू शकतं.
रात्री झोपताना डोळ्यांना लावलेलं काजळ किंवा लायनर शक्यतो काढण्याचा प्रयत्न करावा.
डोळ्यांचा मेकअप झोपताना तसाच ठेवल्यास डोळ्यांजवळील त्वचेची जळजळ तसंच पुरळ येण्याची समस्या होऊ शकते.

- Advertisement -

डोळ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची पाहणी करावी.
क्लिनिंग सोल्युशन, कॉन्टॅक्ट लेन्सेस आमि आय ड्प्स यांची एक्सपायरी डेट तपासून घ्यावी. कॉन्टॅक्स लेन्स वापरताना अधिक काळजी घ्यावा.
डोळे लाल झाले असल्यास किंवा डोळ्यांविषयी काही तक्रार असल्यास सातत्याने ड्रॉप्सचा वापर करू नये, असं केल्याने अनेकवेळा त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.
याबाबतीत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांना प्राधान्य द्यावे.

- Advertisement -