Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeआरोग्य'गुलकंद' उन्हाळ्यात शरीराला ठेवतो 'कूल'!

‘गुलकंद’ उन्हाळ्यात शरीराला ठेवतो ‘कूल’!

Gulkandजसजसा उकाडा वाढायला  लागतो, त्यामुळे पित्त, जळजळ, उष्माघात यासारखे आजार  आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं  घेण्यापेक्षा शीतदायी  व तृष्णाशामक  गुलकंदच घ्या. गुलाबाचे फूल आरोग्यदायी असून फायद्याचेच आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला गुलकंद’,चवीला  अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे.

गुलकंद शरीरात थंडावा निर्माण करतो

साखर व गुलाबाच्या पाकळ्यापासून तयार होणारा गुलकंद शरीरात थंडावा निर्माण करण्याचे  काम करतो. वाढत्या उकाड्यामुळे शरीरात होणारा दाह कमी होतो. उकाड्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ‘डि-हायड्रेशन’चा त्रास होण्याची शक्यता  असते. त्यापासून तुमचा बचाव  होतो.  तसेच शरीरात वाढणार्‍या उष्णतेमुळे पित्त, जळ्जळ यासारख्या समस्यांपासुन आराम मिळतो.

अ‍ॅन्टीऑक्सिडंटनी परिपुर्ण

गुलकंदामुळे शरीराला अ‍ॅन्टीऑक्सिडंट्सचा  पुरवठा होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व  थकवा (अशक्तपणा) दूर होतो.

त्वचा आरोग्यदायी बनवते

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब’ फारच हितकारी आहे. गुलाबाचा मंद सुगंध व अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे  अनेक फेसपॅक्समध्ये,आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचा वापर केला जातो. गुलकंद खाल्ल्याने त्वचेचा पोत आतुन सुधारण्यास मदत होते.

व्हिटमिन्सचा पुरवठा

गुलकंदात गुलाबाबरोबरच , साखरही असल्याने शरीराला व्हिटामिन सी व व्हिटामिन ई चा पुरवठा होतो.

पचनक्रिया सुधारते

जेवणानंतर गुलकंद खाल्ल्यास पचन  उत्तम होण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात उद्भवणारे पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते. गुलकंद हे उन्हाळ्यात उर्जा देणारे एक उत्तम टॉनिक आहे.

घरच्या घरी कसा  बनवालगुलकंद’…  

१.गुलकंद बनवण्यासाठी गावठी जातीचे गुलाब  वापरावे.
२.रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केलेली गुलाब वापरू नयेत.

३.गुलकंदासाठी गुलाबाच्या पाकळ्या व साखर समप्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर ४.घालून घ्यावा.

५.मिश्रणाचे पातेले झाकुन, आठवडाभर  दिवसा सुर्यप्रकाशात तर नंतर सावलीत  ठेवावे  व  दिवसातून एकदा चमच्याने ढवळून घ्यावे.
६.सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे गुलाबाच्या पाकळ्या साखरेच्या पाकात विघटित होतात व गुलकंदाला लाल रंग येतो.

७. गुलकंदाचे तुम्ही नियमित सेवन करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments