Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यगूळ खाऊन सौंदर्य वाढवा

गूळ खाऊन सौंदर्य वाढवा

beauty from jaggery,jaggeryगूळ आरोग्यासाठी जितका चांगला आहे तितकाच तो सौंदर्य वाढवण्यासही उपयोगी आहे. आजारांसह चेहऱ्यावरील डागदेखील गुळामुळे नाहीसे होतात. हे वाचून आपला विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे. तर जाणून घेऊ या काय आहेत गुळाचे फायदे.

चेहऱ्यावरील सुरकुत्या…  
वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यादेखील स्पष्ट दिसू लागतात. गुळातील अँटीऑक्सिडंट त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

सुंदर केस… 
गूळ केसांना दाट व सुंदर बनवतो. गुळात मुलतानी माती, दही व पाणी मिसळून हे मिश्रण केसांना लावा. एका तासाने केस धुवा. यामुळे केस घट्ट, मुलायम व चमकदार बनतात.

मुरूमांसाठी लाभदायक… 
नियमितपणे गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग व मुरूम दूर व्हायला लागतात. याचा लेप बनवून चेहऱ्यावर लावू शकता. एक चमचा गुळात एक चमचा टोमॅटोचा रस, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर हळद व गरम ग्रीन टी मिसळा. हे मिश्रण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा धुवून घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments