Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यघरीच बनवा फेस पॅक

घरीच बनवा फेस पॅक

Face Packनैसर्गिक पदार्थांचा उपयोग करून अँटी एजिंग फेस पॅक घरच्या घरीच बनवले तर यामुळे आपण तरुण दिसायला लागतो. अँटी एजिंग फेस पॅक बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे

आवश्यक साहित्य

एक केळी, एक अंडे, लिंबूचा रस, एक चमचा दही, एक चमचा मध, एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मुलेठी पावडर.

कसे बनवावे

केळी, अंड्याचा पांढरा भाग, दही, मध, मुलेठी पावडर, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून पेस्ट बनवा.

कसे लावावे

तोंड धुताना हलक्या हातांनी ५ मिनिटे मसाज करून चेहरा आणि मानेवर लावा. १० मिनिटांनंतर धुऊन घ्या.

असे होतात फायदे….

फेस पॅकमधील केळी त्वचेला नरिश आणि रिव्हाइटलाइज करते. त्वचा मऊ होते अाणि तेलकट दिसत नाही. – या फेस पॅकमधील अंड्यातील पांढरा बलक त्वचेचा भाग लहान करते. त्वचा टाइट होते आणि सुरकुत्या दिसत नाहीत.

लिंबाच्या रसामधील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा संसर्गापासून बचाव करते. त्वचा आरोग्यदायी आणि तरुण बनते.

फेस पॅकमधील दही त्वचेवर सुरकुत्या, डाग दूर करण्यात मदत करते. त्वचा चमकदार होते.

फेस पॅकमधील मधाने स्किन मॉश्चराइज राहते. मुरुमाची समस्या दूर होते.

ऑलिव्ह ऑइलमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला रिजुविनेट आणि मॉइश्चराइज करतात. चमक आणि मऊपणा वाढतो.

फेस पॅकमधील मुलेठी पावडर त्वचेला स्वच्छ ठेवते. गोरेपणा वाढतो. टॅनिंग दूर होते. चमक येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments