Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यमधुमेह कमी करण्यासाठीही काजूचा उपयोग!

मधुमेह कमी करण्यासाठीही काजूचा उपयोग!

काजूचा वापर प्रामुख्याने हलवा, मिठाई, नमकीन यांच्यामध्ये होत असला तरी त्याचे काही औषधी उपयोगही आहेत. काजूचे मूळ ब्राझिलमध्ये असून काही व्यापाऱ्यांनी काजूची झाडे भारतात आणली. यामध्ये मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. काजूचे फळ आणि बी या दोघांचेही अनेक उपयोग आहेत.

सातत्याने काजू खाल्ल्याने मटॅबॉलिझम नियंत्रित राहते तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, झिंक, आयर्न, मँगनिज, सेलेनियम यांसारखी खनिजे आढळतात.
काजूमध्ये असलेले प्रोएथोसायनिडिन्स फ्लावोनोल्स ट्यूमरशी लढण्यास मदत करते. काजूमधील प्रोएथोसायनिडिन्स व कॉपर कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. तसेच पोटाच्या कॅन्सरपासूनही दूर ठेवतात.
काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम आपल्या हाडांना आतून मजबूत करते. आपल्या शरीराला ३००-७५० मिली ग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते.
काजूमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे काजू तेलकट तसेच कोरड्या त्वचेसाठी चांगले असते. तुमची त्वचा तेलकट असल्यास तुम्ही काजू रात्रभर दूधात भिजत घाला. सकाळी उठल्यावर ते पिसून त्यात मुलतानी माती, लिंबाचा रस, दही घालून चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमचा चेहरा चमकू लागेल. काजूचे तेल सफेद डागांवर लावल्याने हळूहळू ते डाग जातात.
मधुमेह कमी करण्यासाठीही काजूचा उपयोग होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने काजूचे सेवन करा. त्यामुळे शरीरातील इन्स्युलिनचे प्रमाण वाढेल व मधुमेह नियंत्रित राहील.
काजूमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या व्हिटॅमिन व मिनरल्समुळे ते गर्भवती महिलांसाठी उत्तम असते. त्याचे नियमित सेवन गर्भातील बाळाच्या वाढीसाठी लाभदायक असते.
काजूमध्ये असलेल्या कॉपरमुळे केस लांब, मजबूत, दाट, चमकदार होतात. याच्या नियमित सेवनाने केस गळण्याची समस्याही दूर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments