Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeआरोग्यदिवसभरात सहा तास 'हे' काम करुन वजन घटवा

दिवसभरात सहा तास ‘हे’ काम करुन वजन घटवा

तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल परंतु जिममध्ये घाम गाळण्याचा तुम्हाला आळस आला असेल तर काळजी करू नका. फक्त उभे राहून तुम्ही आपले वजन कमी करू शकता. दिवसभरात किमान सहा तास उभे राहिल्याने तुमचे अतिरिक्त वजन कमी होईल.

संशोधकांच्या मते उभे राहिल्याने बसल्याच्या तुलनेत प्रति मिनिट ०.१५ कॅलरी अधिक खर्च होते. दिवसभरात सहा तास बसण्याऐवजी उभे राहिल्याने ६५ किलोच्या प्रौढ व्यक्तीमध्ये ५४ कॅलरी अधिक संपतात. अमेरिका स्थित मायो क्लिनिक इन रोचेस्टरचे प्राध्यापक फ्रान्सिस्को लोपेज जिमेनेज यांनी सांगितले, “उभे राहिल्याने फक्त कॅलरी खर्च होत नाही तर यामुळे स्नायूंच्या गतीने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक व मधुमेहाची शक्यतादेखील कमी होते.”
वजन कमी करण्याच्या इतर उपायांपेक्षा या सोप्या उपायाचा अवलंब तुम्ही सहज करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments