Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यमधुमेहींसाठी काही घरगुती उपाय

मधुमेहींसाठी काही घरगुती उपाय

Diabetesलिंबू : मधुमेह असलेल्या रुग्णांना जास्त तहान लागते. वारंवार तहान लागत असेल तर पाण्यामध्ये लिंबू पिळून पिल्याने तहान भागवता येते.

काकडी : मधुमेहींना भुकेपेक्षा कमी व हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी वारंवार भूक लागल्यास काकडी खाऊ शकता.

जांभूळ : याला मधुमेहींचे फळ असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण याच्या बिया, साल, रस आणि गर सर्वच मधुमेहामध्ये फायद्याचे आहे. जांभळाच्या बिया वाळवून चूर्ण बनवा. दिवसातून दोन-तीन वेळा तीन ग्रॅम चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने मुत्रातील साखरेचे प्रमाण कमी होते.

मेथीदाणे व दालचिनी : मेथीमु‌ळे इन्सुलिनचा स्राव वाढतो आणि कार्बोहायड्रेट्स शोषून घेण्याचे प्रमाणही कमी राहते. याचा वापर पावडर किंवा बियांच्या रूपात केला जातो. दालचिनीमुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे आहारात दोन्हींचा समावेश करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments