या छोट्या गोष्टींनी सकाळ होईल प्रसन्न

- Advertisement -

सकाळी लवकर उठणं अनेकदा नको वाटतं. झोपून राहावसं वाटतं. पण कामावर तर जायचं असतं. मग काही छोट्या टिप्स तुमची सकाळ फ्रेश आणि प्रसन्न करून जाईल.

  • सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच १५ मिनिटं स्ट्रींचिंगचा व्यायाम करा. त्यानं शरीरात एनर्जी येईल. मन प्रसन्न होईल.
  • सकाळी मोबाईल,लॅपटॉप दूरच ठेवा. त्यानं तणाव वाढू शकतो.
  • आवडतं गाणं ऐका.
  • सकारात्मक संदेश मिळणारी पुस्तकं वाचा.
  • पाच मिनिटं तरी दीर्घ श्वसन करा. त्यानंतर थोडा वेळ मेडिटेशन करा.
  • सकाळचा नाश्ता महत्त्वाचा. शरीरात एनर्जी मिळेल, असा नाश्ता करा. त्यात एक तरी फळं असू दे.
  • सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. शक्यतो त्यात लिंबू पिळून घ्या.
- Advertisement -