Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यपोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय!

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय!

बदललेल्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे व ऑफिसमधल्या बैठ्या कामामुळे पोटाजवळची चरबी सुटणे, ही समस्या सामान्य झाली आहे. तुम्हालाही ही समस्या सतावत असेल तर तुमच्या आहारात हे काही बदल करा. त्यामुळे सुटलेले पोट कमी होण्यास आणि तुम्हाला अपेक्षित असलेले फ्लॅट टमी मिळवण्यास मदत होईल. तर कोणते आहेत ते बदल जाणून घ्या…

1. पोट कमी करण्यासाठी काही आहारात काही आवश्यक बदल करणे आणि व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

2. दररोज हेल्दी, सात्विक, संतुलित आहार घेतल्यास खूप फरक पडेल. एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खात रहा. त्याचबरोबर आहारात कॅलरीजचे प्रमाण कमी आणि पोषकघटकांचे अधिक असावे.

3. तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. फास्ट फूड आणि जंक फूड जरुर खा. आहारात फळे, भाज्या यांचा अधिक समावेश करा.

4. रात्री उशिरा जेवण्याची सवय सोडून द्या. रात्री ८ पर्यंत जेवण करुन घ्या. जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. बाहेर पडून वॉक करा. रात्री हलके जेवण घ्या.

5. आहारातील या बदलांसोबत नियमित व्यायाम करणेही आवश्यक आहे. असे केल्याने स्वतःतील फरक जाणवू लागेल.

6. सकाळी उठल्यावर गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून घ्या. यामुळे फॅट्स कमी होतील. तसंच दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी पिण्यास सुरुवात करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments