Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeआरोग्यडोकेदुखीसाठी घरच्या घरी करू शकता हे उपाय

डोकेदुखीसाठी घरच्या घरी करू शकता हे उपाय

This remedy you can do at home for headaches
अनेकदा अचानक डोकेदुखी सुरु होते. डोकेदुखीमुळे प्रत्येकजण त्रस्त होतो. त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. काही घरगुती उपाय करुन बघितल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो.

अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डोकेदुखी होते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डोकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरीरातील अनेक स्नायूंची हालचाल होऊन ते थोडे मोकळे होतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करून व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही, याची काळजी घ्यावी.

पाणी प्या : शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशा प्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डोकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डोकेदुखीवर मात करता येते.

लिंबू पाणी : शरीरातील आम्लाचं प्रमाण कमी अधिक झाल्यास डोकेदुखी होते. अशा प्रकारची डोकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालून ते प्यावं. लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लाचं (अॅसिडचं) प्रमाण संतुलित होतं.

बर्फाचा शेक : अनेकदा डोक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते. एकंदरीत कोणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.

आलेयुक्त चहा : आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहतं.

गरम लवंग : डोकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डोकेदुखीचा त्रास नक्कीच कमी होईल.

अ‍ॅक्युप्रेशर करा : अ‍ॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्नायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर योग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डोकेदुखीपासून सुटका होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments