Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeआरोग्यफिट आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयी महत्वाच्या!

फिट आणि निरोगी राहण्यासाठी ‘या’ सवयी महत्वाच्या!

Fitness gym exercise yoga,Fitness, gym, exercise, yogaदिवसाची सुरुवात करण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या सवयी आहे. कुणी सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाई गडबडीत असतो. कुणी जिमला जातात. तर कुणाल उशीरा झोपेतून उठण्याची सवय असते. प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर या गोष्टी करायला हव्या. त्यामुळे आपले आयुष्य बदलून जाईल.

कोमट पाणी प्या…

सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायला हवे. पाणी पिण्याची ही सवय लावून घ्यायला हवी. घरातल्या प्रत्येकाला तसे करायला सांगायला हवे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने पोटातील आजार दूर होतात. बद्धकोष्ठता दूर होते. याची सुरुवात आजपासूनच करा.

भिजलेले बादाम घ्या…

रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठल्यानंतर खाण्याची सवय लावा. बदामांसह अक्रोडदेखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातून शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने मिळते. शिवाय स्नायू मजबूत करण्यास मदत करते.

व्यायाम करा…

जिमला जाण्याची वेळ नसेल तर सूर्य नमस्कार सारखा योग घरातच करा. ताण आणि चिंता कमी करण्यासाठी दररोज ध्यान करणेदेखील गरजेचे आहे. नियमित चालण्याचे व्यायाम करून आपण शरीराची सक्रियतादेखील वाढवू शकता. विविध योगासनातून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करा.

नाष्टा गरजेचा…

सकाळच्या न्याहारीने शरीराला ऊर्जा मिळते. नाष्टा न केल्यामुळे कामात मन न लागणे, बेचैन होणे चिडचिड देखील होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी विटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटिऑक्सिडेंट्स असलेले पदार्थ घ्या. न्याहारीत नेहमी दलिया, पोहे, इडली-सांभर, फ्रूट घ्या यातून तुम्हाला पोषक तत्त्व मिळते आणि तुम्ही दिवसभर एनर्जीटिक राहता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments