Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यगारव्यांमुळे हातपाय आखडतात 'हे' करुन बघा

गारव्यांमुळे हातपाय आखडतात ‘हे’ करुन बघा

leg swelling during winterथंडी म्हटले की काही लोकांना त्याचा त्रास होतो. तर कुणाला थंडीची वेगळीच मज्जा वाटते. परंतु थंडीच्या दिवसात बरेचदा हातपाय गारव्यांमुळे आखडतात, ज्यामुळे हात आणि पायाला सूज येते. थंडीत हातापायाला येणारी सूज आणि खाज यामुळे हैराण असाल तर यामागील कारणे आणि यावरील उपाय जाणून घ्या.

थंडीत सूज येण्यामागचे काय आहे कारण..

हिवाळ्यात अनेकदा हात आणि पाय सुजण्यामागे हे मुख्यतः अति थंड वातावरणात राहिल्यामुळे रक्त गोठणे हे असते. कारण हिवाळ्यात रक्तप्रवाह हळू होतो. अशावेळी हात आणि पाय बराच काळ थंड पडल्यास ब्लड सर्क्युलेशन कमी होते. ज्यामुळे हातापायांना सूज येते आणि ते लाल दिसू लागतात. पण उबदारपणा मिळाल्यास ब्लड सर्क्युलेशन हळूहळू नॉर्मल होते. यासाठी पुढील उपाय जरूर करा.

मोहरीचे तेल : रात्री झोपताना पहिल्यांदा गरम मोहरीच्या तेलात सैंधव मीठ मिक्स करून ते हलक्या हातांनी सूज आलेल्या ठिकाणी हातापायांना आणि बोटांना लावा व मोजे घालून झोपा. असे आठवड्यातून 5-6 दिवस केल्यास लगेच आराम मिळतो.

बटाट्याचा रस : एक बटाटा घ्या आणि मीठ लावून ज्या ठिकाणी सूज आली आहे तिकडे लावा. असे म्हटले जाते, बटाट्यात जळजळविरोधी तत्त्वे असतात. ज्यामुळे खाज आणि सूजही कमी होते.

लिंबाचा रस : लिंबाचा रस आपल्या हात आणि पायाला लावल्यास सूज खूप प्रमाणात कमी होते. त्यामुळे एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि रात्री झोपण्याआधी बोटांना लावा. मग कव्हर करून झोपून जा. यामुळे काही दिवसांतच सूज कमी होईल.

हळदीने दूर करा सूज : हळदीत अँटिबॉयोटिक आणि अँटिसेप्टिक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच हळदीमध्ये उष्णताही असते. त्यामुळे हिवाळ्यात उबदार वाटते. अशावेळी जर हळदीची पेस्ट बनवून हात आणि पायाला झोपतेवेळी लावल्यास वेदना आणि खाजेपासून सुटका होते. हा उपाय 3-4 दिवस केल्यास लगेच फरक जाणवेल.

मटारनेही कमी होईल सूज : हातपायांची सूज कमी करण्यासाठी या मौसमात बाजारात येणारे मटारही खूप फायदेशीर असतात. त्यामुळे हिरवे मटार चांगले उकळून घ्या आणि त्या पाण्याने हातापायाला शेक द्या. रात्री झोपताना मोजे घालून झोपा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्की करा.

कांद्याचा रस : हळदीप्रमाणेच कांद्यातही अँटिबॉयोटिक आणि अँटिसेप्टिक गुण आढळतात. ज्यामुळे हात आणि पायाच्या बोटांची सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कांद्याचा रस काढा आणि झोपताना सूज आलेल्या जागेवर पूर्ण रात्र लावून तसेच राहू द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments