हात धुण्याच्या सवयीमुळे ‘कोणताही संसर्ग’ टाळू शकतो!

- Advertisement -

Hand wash sanitizer, coronavirus, corona, #stayhomestaysafe,coronainmaharashtraसंसर्ग आणि आजार टाळण्यासाठी नियमित अंतराने हात धुण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे. बालपणापासून घरांमध्ये आणि शाळेत ती शिकवली जाते. त्यानुसार आपले हात स्वच्छ करा आणि इतरांना स्वच्छतेसाठी प्रेरित करा. मुलांना स्वच्छतेबद्दल सांगा जेणेकरुन त्यांना लहान वयातच स्वच्छतेविषयी कळेल. स्वच्छतेविषयी जाणून घेऊ या.

दिवसातून पाच वेळेस हात धुवा…

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतेसंसर्ग टाळण्यासाठी दिवसातून पाच वेळा हात धुणे गरजेचे आहे. एखाद्या रुग्णाची देखरेख करत असाल तर कृत्रिम नखे घालू नका. नखे लहान आणि स्वच्छ ठेवा. कोणते काम केल्यानंतर हात धुवायचे आहेत हे स्वतःच ठरवा. त्यानंतर सॅनिटायझर लावा.

- Advertisement -
  • ड्रायरने कोरडे करा…
  • आपले हात थंड किंवा गरम पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवा.
  • नळ बंद करूनहाताला चांगली साबण लावा.
  •  बोटाला आणि नखाला साबण लावल्यानंतर हात चांगले चोळा.
  • 20 सेकंदापर्यंत हात चोळा.
  • नळ सुरू करा आणि वाहत्या पाण्याने हात स्वच्छ धुवा.
  • स्वच्छ टॉवेलने हात पुसून काढा किंवा एअर ड्रायरने पूर्णपणे कोरडे करा.
  • सॅनिटायझर एक चांगला उपाय…

डॉक्टरांच्या मतेआपण एखाद्या ठिकाणी अडकल्यावर किंवा वारंवार हात धुवू शकत नसल्यास अशा स्थितीत हँड सॅनिटायझर वापरावे. यामुळे हातात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात.

- Advertisement -