Friday, March 29, 2024
Homeआरोग्यकार्यालयात काम करताना अरबट-चरबट खाणे टाळा

कार्यालयात काम करताना अरबट-चरबट खाणे टाळा

Employees Eating While Working,Employees on work,Antioxidants,Protein,Vitaminकार्यालयात तासन् तास काम करताना भूक लागले साहजीक आहे. त्यामुळे काहीतरी अरबट-चरबट तोंडात टाकण्याची सवय असते. ही सवय असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. पण खालील गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या आरोग्यासाठी निश्चितच फायदयाच्या असतील.

काम करताना भूक लागली की बटाट्याचे वेफर्स किंवा मिळेल ते पदार्थ आपण काम करताना तोंडात टाकतो. पणअशावेळी तुमच्याकडे ड्राय फ्रुटस असतील तर उत्तमच. न्युट्रिशनसाठी ड्राय फ्रुट्स हे उत्तम पर्याय आहे. तुम्ही हे सकाळी जाताना पर्समध्ये घेऊन जाऊ शकतात. तसेच कामात असताना भूक लागल्यास खाऊ पण शकता. फळे खाल्ल्याने तुम्ही तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.

ऑफिसमध्ये जर तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर कडधान्ये खाणे केव्हाही चांगले. यात प्रोटिनव्हिटॅमिनअॅन्टी ऑक्सिडट्स आणि अमिनो अॅसिड असते. कडधान्ये खाल्ल्याने शरीरात ताकद येण्यास मदत होते. यामुळे फास्टफूड खाण्याची इच्छा कमी होते. यासाठी हरबरेहिरवे मूग आणि सोया एकत्र रात्री भिजत टाका. दुसऱ्या दिवशी जेव्हा मोड येईल त्यावर कांदाटोमॅटो जिरे बारीक करून खा. त्यामुऴे निश्चित फायदा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments