सोने 40 हजार रुपये प्रति तोळ्याचा टप्पा लवकरच ओलांडेल

- Advertisement -

मुंबई: जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढल्याने प्रतितोळा ३8 हजार 870 रुपयांवर पोहोचला आहे.परदेशी बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने सोन्याच्या दरात गेल्या सहा महिन्यापासून विक्रमी वाढ होत आहे. ही वाढ अजून सुरूच राहणार असल्याने सोने 40 हजार रुपये प्रति तोळ्याचा टप्पा ओलांडेल असे तज्ञांचे मत आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा दर 32 हजार 450 रुपये होता. सध्या हा दर 38 हजार 870 रुपये आहे. वर्षभरात दरात 7 हजार167 रुपयांची वाढ झाली. ही वाढ विक्रमी असल्याने सराफ व्यवसायात कमालीची शांतता आहे. भविष्यात आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने दागिने मोडण्यासही ग्राहक येत नाहीत. मंदी, महापुराचा फटका आणि त्यातच सोने दरात रोज वाढ होत असल्याने सराफ व्यवसायाची सरासरी 75 टक्के उलाढाल ठप्प झाली आहे.

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. सोन्याची आयात डॉलरमध्ये होत असल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणामही सोने दरावर होत आहे. जागतिक बाजार अस्थिर झाल्याने बँका धास्तावल्या आहेत. भविष्यातील धोका ओळखून जागतिक बँकांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. मागणीत वाढ झाल्याने दरात वाढ होत आहे केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वीच सोन्याच्या आयात शुल्कात तोळ्याला अडीच टक्क्यांची वाढ करून ते साडेबारा टक्के केले. शिवाय तीन टक्के जीएसटी आहे. यामुळे सोने दरात  मोठी वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याचा सध्याचा दर ३८,८७०  हजार रुपये आहे. मात्र विविध करांपोटी ग्राहकांना पाच ते साडेपाच हजार रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. सोन्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने सराफ व्यवसायावर वितरित परिणाम होत आहे. येथून पुढे सुरु होणारे लग्नसराई तसेच दसरा आणि दिवाळी या सणाला सोन्याची मोठी खरेदीची  उलाढाल होते. सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांनी सध्या पाठ फिरवली आहे. ग्राहकांना कसे आकर्षित करायचे याबाबत सराफ व्यावसायिकांना चिंता लागली आहे.

- Advertisement -
- Advertisement -