होम देश अमेरिकेच्या पर्यटकांना सूचना: भारतात बलात्कार वाढले,काळजी घ्या!

अमेरिकेच्या पर्यटकांना सूचना: भारतात बलात्कार वाढले,काळजी घ्या!

15
0
शेयर

वॉशिंग्टन – अमेरिकेने बुधवारी भारतासह अन्य देशांतील पर्यटन विषयक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्या पर्यटकांसाठी अत्यंत सोयीस्कर असल्याचेही अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये पर्यटन योग्य देशांचे एक ते चार स्तर करण्यात आले आहेत. या पर्यटनाच्या स्तरामध्ये भारताचा स्तर हा दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान हा पर्यटन योग्य देशाच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या स्तरामध्ये आहे.

पर्यटनास योग्य देशांचे जे ४ स्तर करण्यात आले आहेत.  त्यामध्ये पहिल्या स्तरामध्ये समावेश असलेल्या देशात पर्यटनास जात असताना जास्त काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर ज्या देशांचा चौथ्या क्रमांकाच्या स्तरामध्ये समावेश होतो, त्या ठिकाणी पर्यटनास न जाण्याचा सल्ला दिला आहे. जसे की अफगाणिस्तानसारख्या देशांचा या यादीत समावेश आहे.
या नव्या पर्यटन सल्ल्याच्या प्रणालीनुसारच आता प्रत्येक देशातील पर्यटनाबाबत मार्गदर्शक सूचना उपलब्ध होतील. या बदलामुळे अमेरिकन पर्यटकांना जगभरात कोणत्याही ठिकाणची योग्यवेळी आणि सुरक्षा विषयक माहिती पुरवणार असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.
भारताचा दुसऱ्या स्तराच्या यादीत समावेश करताना अमेरिकन पर्यटन विभागाने भारतातील वाढती गुन्हेगारी व दहशतवादाकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे भारतात पर्यटन करताना सावधानता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पूर्व लेह – लडाख सोडून जम्मू काश्मीरमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत-पाक सीमेपासून १० किलोमीटर परिसरात सातत्याने लष्करी कारवाया होत आहेत, त्या भागातून प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतामधील पर्यटनविषयक मार्गदर्शन सूचनांमध्ये भारतातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये बलात्कार, विनयभंग या सारख्या हिंसक घटना पर्यटनस्थळावरच घडत आहेत. त्यामुळे अमेरिकन महिलांनी पर्यटनस्थळांवर अधिक काळजी घ्यावी, असेही सुचित करण्यात आले आहे.