आज पासून विशेष राजधानी सुसाट…

- Advertisement -

मुंबई : दिवाळी निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली आहे .दिल्ली मुंबई दरम्यान आता नवीन विशेष राजधानी एक्सप्रेस आजपासून सुरु होणार आहे. ही राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून तीनवेळा सुरु राहणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी सुसाट धावणार आहेँ.

दिल्ली आणि मुंबईच्या प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जलद गती ट्रेन सुरु करण्याची मागणी होती. यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राची  हि मागणी पूर्ण केली आहे.

हजरत निजामुद्दीन  ते बांद्रा टर्मिनस आणि ब्रांद्रा टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन दरम्यान ही गाडी दोन्ही बाजूने बुधवार, शुक्रवार आणि शनिवार धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -