आधी बलात्कार पीडितेची साक्ष नोंदवली जाऊ द्या त्यानंतर…

- Advertisement -

नवी दिल्ली: बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापूला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. आधी बलात्कार पीडितेची साक्ष नोंदवली जाऊ द्या. त्यानंतरच जामीनावर विचार केला जाईल,’ असं न्यायालयाने आज स्पष्ट केलं.

आसाराम बापूच्या वकिलाने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आसाराम बापूचं वय झालं असून आरोग्याच्याही तक्रारी उदभवल्या आहेत. त्यामुळे बापूला जामीन द्यावा, अशी विनंती वकिलाने केली. मात्र न्यायालयाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली.
गुजरातच्या गांधी नगर येथील बलात्कार प्रकरणी आसाराम बापू अटकेत असून त्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आसारामच्या याचिकेवर धीम्यागतीने सुनावणी होत असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले होते. पीडित मुलीची साक्ष अद्याप का नोंदविली नाही? असा सवालही न्यायालयाने केला होता. तसंच या प्रकरणाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

- Advertisement -